पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या चार्जशीटमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतनला लोहगडाच्या दरीत ढकलल्याचे तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पोलिसांच्या हाती लागले आहेत. हे तिन्ही साक्षीदार (Three Eyewitnesses) न्यायालयात आरोपींविरोधात साक्ष देण्यास तयार असल्याने या खटल्याला अत्यंत महत्त्वाचे वळण मिळाले आहे. तपासात असे समोर आले आहे की, मार्च 2026 पासूनच केतनला रस्त्यातून हटवण्याचा कट रचला जात होता. सुरुवातीला आरोपींनी परराज्यातील एका व्यक्तीला सुपारी देऊन केतनला अपंग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी स्वतःच त्याचा खून करण्याचा निर्णय घेतला. (Ketan Agrawal)
Ketan Agrawal Murder Case : 'त्या' फोटोंमुळे केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवं वळण; पोलिसांना मिळाला सर्वात मोठा पुरावा!
पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांच्या हाती आणखी काही महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. लोणावळ्यातील लोहगड ...
पोलिसांच्या हाती लागले मुख्य पुरावे
विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला सुपारी देण्याचा प्रयत्न झाला होता, (Lohagad Murder Case,) तोच आता या प्रकरणात पोलिसांचा मुख्य साक्षीदार बनला आहे. आरोपींनी पोलिसांपासून वाचण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट जीपीटीसारख्या एआय टूल्सचा वापर केला होता. तसेच अनेक क्राईम पॉडकास्ट आणि मर्डर सिनेमे पाहून मेघालयमधील गाजलेल्या एका प्रकरणाचा अभ्यासही केला होता. आरोपींनी आधी टायगर पॉईंटची पाहणी केली, पण शेवटी लोहगड किल्ल्याची निवड केली. अपघात झाल्याचा बनाव करता यावा म्हणून त्यांनी ही जागा निवडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (Siya Goyal)
एकदा नाही तर तीन वेळा मारण्याचा प्रयत्न
केतनचा खून (Ketan Agarwal Case Update) करण्यासाठी आरोपींनी तीन वेळा प्रयत्न केले. पहिल्या प्रयत्नात कॅफेच्या वॉशरूममध्ये केतनचा पासपोर्ट फाडून त्याचा परदेश दौरा रद्द करण्यात आला. 14 जून रोजी लोहगडावर त्याला दरीत ढकलण्याचा आणि सापाची भीती दाखवून पाडण्याचा प्रयत्न फसला. अखेर 18 जून 2026 रोजी आरोपींनी इन्स्टाग्रामवर 'माही' नावाचे बनावट अकाऊंट बनवून केतनला सरप्राईज पार्टीच्या बहाण्याने लोहगडावर बोलावले. तिथे संधी साधून त्याला दरीत ढकलण्यात आले. सध्या या प्रकरणातील तिन्ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे पुरावे आरोपींना शिक्षा मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.






