पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांच्या हाती आणखी काही महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावरून केतनला दरीत ढकलून त्याची हत्या केल्याचा आरोप असलेल्या सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या कथित गुप्त लग्नाची माहिती तपासातून समोर आली आहे. पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात आरोपींच्या मोबाईलमधून मिळालेल्या काही पुराव्यांचाही समावेश केला आहे. (Ketan Agrawal Murder Case) या प्रकरणी पोलिसांनी 5000 हून अधिक पानांची चार्टशीट दाखल केली असून या प्रकरणात नवी माहिती समोर येत आहे.
मुंबई : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर दिसून येत आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाला ...
सिंदूर अन् गळ्यात हार घातल्याचा फोटो
पोलिसांच्या माहितीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये सिया आणि चेतन काही मित्रांसोबत राजस्थानला गेले होते. यावेळी त्यांनी खाटूश्याम मंदिरात गुपचूप लग्न केल्याचा पोलिसांना संशय आहे. तपासादरम्यान पोलिसांना दोघांचा एक फोटो मिळाला. या फोटोमध्ये सियाच्या भांगेत सिंदूर दिसत असून चेतनच्या गळ्यात फुलांचा हार आहे. हा फोटो पोलिसांनी दोषारोपपत्रासोबत न्यायालयात सादर केला आहे.
तपासानुसार, सिया आणि चेतन यांच्यात ऑक्टोबर 2025 पासून जवळीक वाढली होती. त्यांच्या नात्याला दोन्ही कुटुंबांचा विरोध असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. राजस्थानला जाण्यासाठी दोघांनी सुरुवातीला विमानाचे नियोजन केले होते. मात्र विमानसेवा रद्द झाल्यानंतर त्यांनी रेल्वेने राजस्थान गाठले. खाटूश्याम मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. याच ठिकाणी लग्न झाल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र लग्नाच्या वेळेचे कोणतेही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालेले नाही. ( Ketan Agrawal)
दरम्यान, 18 जून 2026 रोजी केतनच्या हत्येनंतर आरोपींच्या हालचालींची माहितीही पोलिसांनी तपासात नोंदवली आहे. केतनला लोहगड किल्ल्यावरून सुमारे 400 फूट खोल दरीत ढकलल्यानंतर चेतन दुचाकीवरून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील एका हॉटेलमध्ये गेला होता. तेथे त्याने मिसळ खाल्ल्याची माहिती समोर आली आहे. किल्ला आणि हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या हालचालींचा क्रम तपासला आहे.






