Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्याकांडात सर्वात मोठा खुलासा; लोहगडावर दरीत ढकलताना पाहणारे 'ते' 3 प्रत्यक्षदर्शी समोर!


पुणे :  केतन अग्रवाल हत्या प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या चार्जशीटमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतनला लोहगडाच्या दरीत ढकलल्याचे तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पोलिसांच्या हाती लागले आहेत. हे तिन्ही साक्षीदार (Three Eyewitnesses) न्यायालयात आरोपींविरोधात साक्ष देण्यास तयार असल्याने या खटल्याला अत्यंत महत्त्वाचे वळण मिळाले आहे. तपासात असे समोर आले आहे की, मार्च 2026 पासूनच केतनला रस्त्यातून हटवण्याचा कट रचला जात होता. सुरुवातीला आरोपींनी परराज्यातील एका व्यक्तीला सुपारी देऊन केतनला अपंग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी स्वतःच त्याचा खून करण्याचा निर्णय घेतला. (Ketan Agrawal)




पोलिसांच्या हाती लागले मुख्य पुरावे



विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला सुपारी देण्याचा प्रयत्न झाला होता, (Lohagad Murder Case,) तोच आता या प्रकरणात पोलिसांचा मुख्य साक्षीदार बनला आहे. आरोपींनी पोलिसांपासून वाचण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट जीपीटीसारख्या एआय टूल्सचा वापर केला होता. तसेच अनेक क्राईम पॉडकास्ट आणि मर्डर सिनेमे पाहून मेघालयमधील गाजलेल्या एका प्रकरणाचा अभ्यासही केला होता. आरोपींनी आधी टायगर पॉईंटची पाहणी केली, पण शेवटी लोहगड किल्ल्याची निवड केली. अपघात झाल्याचा बनाव करता यावा म्हणून त्यांनी ही जागा निवडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (Siya Goyal)


एकदा नाही तर तीन वेळा मारण्याचा प्रयत्न



केतनचा खून (Ketan Agarwal Case Update) करण्यासाठी आरोपींनी तीन वेळा प्रयत्न केले. पहिल्या प्रयत्नात कॅफेच्या वॉशरूममध्ये केतनचा पासपोर्ट फाडून त्याचा परदेश दौरा रद्द करण्यात आला. 14 जून रोजी लोहगडावर त्याला दरीत ढकलण्याचा आणि सापाची भीती दाखवून पाडण्याचा प्रयत्न फसला. अखेर 18 जून 2026 रोजी आरोपींनी इन्स्टाग्रामवर 'माही' नावाचे बनावट अकाऊंट बनवून केतनला सरप्राईज पार्टीच्या बहाण्याने लोहगडावर बोलावले. तिथे संधी साधून त्याला दरीत ढकलण्यात आले. सध्या या प्रकरणातील तिन्ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे पुरावे आरोपींना शिक्षा मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.



Comments
Add Comment

Pravin Darekar : भाजप गटनेते प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील कारचा अपघात

मुंबई : भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील एका कारला मुंबईतील फ्रीवेवर सोमवारी

Train Safety System : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात 'कवच ४.०' सुरक्षा ऑडिट चाचणी यशस्वी; रेल्वे सुरक्षेत महत्त्वपूर्ण टप्पा गाठला

सोलापूर : मध्य रेल्वेने रेल्वे सुरक्षेच्या आधुनिकीकरणात एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सोलापूर विभागाने

Mumbai News: मुंबईतील बंद कबुतरखाने तात्काळ उघडा, जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा अल्टीमेटम

मुंबई: मुंबईतील बंद करण्यात आलेले सर्व कबुतरखाने तात्काळ सुरू करण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,

Nashik News : समृद्धी, एक्स्प्रेसवेवर 24 तास वाॅच ! महामार्ग सुरक्षेसाठी मोठा निर्णय; 1,101 कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांची मुदतवाढ

Nashik News : राज्यातील समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे आणि प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांना आळा

Nashik Crime News : ओमनी व्हॅनमधील 'त्या' मृतदेहाची ओळख पटली, मृत्यूचे कारण...

Nashik Crime News: नाशिकच्या पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड परिसरात सोमवारी सकाळी उभ्या असलेल्या मारुती ओमनी व्हॅनमध्ये

Asian Games 2026 : भारतीय महिला हॉकी संघाचा इंडोनेशियावर १७-१ असा दणदणीत विजय

नागोया: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने आपले वर्चस्व कायम राखत आणखी एका धमाकेदार