Monday, September 21, 2026

Disha Salian case : दिशा सालियन प्रकरणात सतीश सालियन यांचा सवाल; ‘सत्ता गेल्यावरही एवढी दादागिरी का?’

Disha Salian case : दिशा सालियन प्रकरणात सतीश सालियन यांचा सवाल; ‘सत्ता गेल्यावरही एवढी दादागिरी का?’

मुंबई : दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून दिशाचे वडील सतीश सालियन यांनी काही गंभीर आरोप करत आपली भूमिका मांडली आहे. आपली मुलगी न्याय मिळावा यासाठी आपण कायदेशीर लढा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच आपल्याला, साक्षीदारांना आणि वकिलांना धमकावले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. (Satish Salian)

“आज सत्ता हातात नसतानाही आम्हाला आणि आमच्या वकिलांना धमकावण्याची भाषा केली जात असेल, तर सत्ता हातात असताना काय झाले असेल?” असा सवाल सतीश सालियन यांनी केला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नसल्याचे स्पष्ट आहे. ( Disha Salian case)

सतीश सालियन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची लढाई कोणत्याही राजकीय स्वार्थासाठी नसून मुलीच्या मृत्यूमागचे सत्य समोर आणण्यासाठी आहे. आपले म्हणणे पुराव्यांच्या आधारे खोडून काढण्याऐवजी चारित्र्यहनन आणि बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला.

तसेच साक्षीदारांवर दबाव आणला जात असल्याचा आणि त्यांच्या वकिलांना प्रॅक्टिस करू न देण्याची भाषा केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकरणातील आरोप, उपलब्ध पुरावे आणि न्यायालयीन नोंदी यांच्या आधारे सत्य समोर यावे, दोषी कोण आहेत हे कायदेशीर प्रक्रियेतून ठरावे, अशी भूमिका सालियन यांनी मांडली. पुरावे नष्ट किंवा बदलण्यात आले का, नोंदींमध्ये फेरफार झाला का आणि त्यामागे कोण होते, याची चौकशी व्हावी, असेही त्यांनी म्हटले आहे. (Crime News)

माध्यमांनीही या प्रकरणातील तथ्ये आणि न्यायालयीन नोंदी तपासून बातम्या द्याव्यात, असे आवाहन सतीश सालियन यांनी केले. मुलीला न्याय मिळेपर्यंत आपली कायदेशीर लढाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >