Japan : एशियन गेम्स 2026 स्पर्धेपूर्वी भारत आणि जापान यांच्यात मैत्रिपूर्ण लढत होणार आहे. हा सामना सानो स्टेडियमममध्ये 22 सप्टेंबरला खेळला जाणार आहे. पण या सामन्यापूर्वीच धाकधूक वाढली आहे. कारण जापानमधील वातावरण पाहता हा सामना होईल की नाही याबाबत शंका आहे. भारतीय पहिल्यांदाच जापान विरुद्ध सामना खेळणार आहे. दोन्ही देशातील क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. असं असताना हा सामना होईल की नाही? याबाबतची चिंता श्रेयस अय्यर यालाही हा प्रश्न सतावत आहे. श्रेयस अय्यरने या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत आपलं म्हणणंही मांडलं आहे. श्रेयस अय्यरने आशा व्यक्त केली की, हवामानाचा या सामन्यावर कोणताही परिणाम होणार नाही.(India vs Japan T20)
मुंबई: उत्तम अभिनेता आणि कवी म्हणून मराठी प्रेक्षकांमध्ये घर निर्माण करणारे अभिनेते किशोर कदम सध्या चर्चेत आहेत. कायमच आपल्या सिंपल अभिनयाच्या ...
श्रेयस अय्यर नेमकं काय म्हणाला?
जापानविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी श्रेयस अय्यरने आपल्या भावना व्यक्त केल्या. जापानविरुद्धच्या सामन्यासाठी उत्सुक असल्याचं अय्यरने सांगितलं. श्रेयस अय्यर म्हणाला की, 'या सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. आम्ही पहिल्यांदाच जापानविरुद्ध खेळणार आहोत. आम्हाला इथल्या परिस्थिती आणि खेळपट्टीबाबत फार काही माहिती नाही. पण एका चांगल्या सामन्याची अपेक्षा आहे.' श्रेयस अय्यर पुढे म्हणाला की, 'आम्ही जापानविरुद्धच्या सामन्यासाठी प्रचंड उत्सुक आहोत आणि आशा आहे की पाऊस पडणार नाही. स्टेडियममध्ये येणाऱ्या सर्व चाहत्यांना एक चांगला सामना पाहण्याची संधी मिळेल.'
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील प्रवासी आणि रिक्षाचालकांमधील संघर्ष, भाड्याबाबतची अनिश्चितता आणि रिक्षांच्या रांगांमुळे होणारी गैरसोय दूर ...
सानोतील वातावरण कसं असेल?
भारत जापान सामना असलेल्या सानोमध्ये गेल्या काही दिवसापासून वातावरण काही चांगलं दिसत नाही. वेदर रिपोर्टनुसार, सानोमध्ये सोमवारी जोरदार पाऊस असेल. इतकंच काय तर मंगळवारी सकाळी आणि दिवसभर अशीच स्थिती असू शकते. म्हणजेच सामन्यावेळी पावसाची शक्यता आहे. पावसामुळे आउट फील्ड खराब झाली तर सामना अडचणीत येऊ शकतो. कारण जापानमध्ये सामना आयोजित केलेल्या मैदानात ड्रेनेज सिस्टम हवी तशी चांगली नाही. त्यामुळे सामन्यापूर्वी होणारं सराव शिबिर रद्द करावं लागलं.(India vs Japan T20)






