Disha Salian Case : 'तो मोठा खुलासा करणारच होता अन्...' दिशा सालियन प्रकरणात सुशांतच्या भावाच्या दाव्याने खळबळ

मुंबई : मुंबईतील दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू झाल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. बॉम्बे हायकोर्टाच्या आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच CBI ने दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात FIR दाखल करून तपास सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा चुलत भाऊ पन्ना सिंह याने काही महत्त्वाचे दावे केले आहेत. मात्र, हे दावे अद्याप तपासातून सिद्ध झालेले नाहीत.



आदित्य ठाकरे एकमेव मुलगा, मनात येईल ते करायचा


पन्ना सिंह यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला की, सुशांत 2019 मध्ये बिहारमधील  पूर्णिया येथे आला होता. त्यावेळी तो आपल्याला काही महत्त्वाची माहिती सांगणार होता, मात्र वेळ कमी असल्यामुळे त्याला सविस्तर बोलता आले नाही. सुशांतने लवकरच मोठी माहिती देणार असल्याचे आणि पत्रकार परिषद घेण्याचा विचार असल्याचे सांगितल्याचा दावा पन्ना सिंह यांनी केला आहे.



दिशा सालियन यांचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी, 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूत आपल्या वांद्रे येथील घरात मृतावस्थेत आढळला. दोन्ही घटनांमध्ये संबंध असल्याचे दावे यापूर्वीही करण्यात आले आहेत. मात्र, या दोन्ही प्रकरणांमध्ये नेमका काय संबंध आहे, याचा तपास सध्या CBI करत आहे.


आदित्य हा एकुलता एक मुलगा होता, त्यामुळे त्याच्या मनात जे यायचे तेच तो करायचा. पन्ना सिंह यांचा असा दावा आहे की, दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा थेट सहभाग होता. पन्ना सिंह म्हणाले की, "सीबीआयने आदित्य ठाकरे यांच्याबद्दल कोणत्याही दबावाशिवाय आपल्या स्तरावर निष्पक्ष चौकशी करावी, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.

मोठ्या कटातून सुशांतची हत्या, उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत


दरम्यान, सुशांत सिंह राजपूत यांचे काका मनमोहन सिंह यांनी सांगितले की, आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. ज्यावेळी सुशांतच्या मृत्यूची बातमी आली होती, त्यावेळी तो आत्महत्या करू शकतो यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. एका मोठ्या कटाचा भाग म्हणून सुशांतची हत्या करण्यात आली होती. यामध्ये अनेक बड्या लोकांचा समावेश होता आणि काही लोक तर असे आहेत ज्यांची नावे अजूनही समोर आलेली नाहीत.




सीबीआय करणार चौकशी


CBI ने दाखल केलेल्या FIR मध्ये आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), रिया चक्रवर्ती, दिनो मोरिया, सूरज पंचोली यांच्यासह अनेक व्यक्तींच्या भूमिकेची चौकशी करण्याचा उल्लेख आहे. मात्र, CBI च्या माहितीनुसार या टप्प्यावर कोणालाही आरोपी म्हणून घोषित करण्यात आलेले नाही. तपासादरम्यान पुरावे मिळाल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.


दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन यांना आपण कधी भेटलो किंवा ओळखत असल्याचा दावा फेटाळला आहे. या प्रकरणातील आरोप पुराव्याशिवाय करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले असून, निष्पक्ष तपास होऊ द्यावा, अशी भूमिका घेतली आहे.


CBI आता उपलब्ध कागदपत्रे, साक्षीदारांचे जबाब आणि घटनास्थळाशी संबंधित पुराव्यांचा तपास करत आहे. त्यामुळे या तपासातून पुढे कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Water Supply : मध्य वैतरणा तलाव भरला ; भातसाही रांगेत

तलाव क्षेत्रात ९७.७७ टक्के पाणीसाठा मुंबई (विशेष प्रतिनिधी.) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तानसा,

BMC Slum Demolition : मुंबईतील झोपड्यांच्या 14 फुटांवरील वाढीव बांधकामांवर हातोडा पडणार की नाही?

महापालिका सभागृहनेत्यांनीही कारवाईला स्थगिती देण्याची केली आयुक्तांकडे मागणी यापूर्वी काँग्रेस आणि

BMC New Policy : महापालिकेच्या मालमत्तांच्या पुनर्विकासाचे नवीन धोरण

महापालिकेच्या तिजोरीत आता वाढणार निधी वाढीव एफएसआयवर आकारणार प्रिमियम मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Ganpati Decoration Safety : सजावट आणि रोषणाई आकर्षक असली तरी भाविकांचा जीव महत्वाचा

विद्युत सुरक्षेबाबत सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केले आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) : काळाचौकी येथे

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी शाहरुख खानची हजेरी; कुटुंबासह घेतले बाप्पाचे दर्शन

मुंबई: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध आणि मानाच्या अशा 'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी

Mumbai News: मुंबई पोलिसांचा प्रामाणिकपणा, रस्त्यामध्ये हरवलेली 2 लाख 90 हजार रूपये असलेली पिशवी मालकाला शोधून दिली...

मुंबई: मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीचे हरवलेले तब्बल 2 लाख 90 हजार रूपये शोधून दिले आहेत. मुंबई पोलिसांनी केलेल्या