Tuesday, September 22, 2026

IND vs JPN : अभिषेक शर्माचा जापानमध्ये नकोसा विक्रम, पहिल्याच चेंडूवर विकेट आणि नको त्या पंगतीत बसला

IND vs JPN : अभिषेक शर्माचा जापानमध्ये नकोसा विक्रम, पहिल्याच चेंडूवर विकेट आणि नको त्या पंगतीत बसला
भारत आणि जापान यांच्यात मैत्रिपूर्ण सामना सुरू आहे. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामना फक्त 5 षटकांचा करण्यात आला. नाणफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण भारताची सुरूवात काही चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात अभिषेक शर्माच्या रुपाने धक्का बसला. त्याला खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे त्याच्या नावावर नकोसा विक्रम रचला गेला. सामना सुरू झाल्यानंतर संजू सॅमसनने स्ट्राईक घेतली आणि 5 चेंडूंचा सामना करून एका षटकाराच्या मदतीने 7 धावा केल्या. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी अभिषेक शर्मा स्ट्राईकला आणि नको ते करून बसला. पहिल्याच चेंडूचा सामना केला आणि विकेट फेकून आला. त्यामुळे त्याच्या नावावर नकोसा विक्रम रचला गेला आहे.

अभिषेक शर्माच्या नावावर नकोसा विक्रम

जापानकडून पहिलं षटक चार्ली हारा हिंजे टाकण्यासाठी आला होता. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अभिषेक शर्माने जोरदार प्रहार केला पण झेल बाद होत तंबूत परतला. अभिषेक शर्माने पहिल्याच चेंडूवर विकेट टाकली आणि चाहत्यांचा भ्रमनिरास झाला. इतकंच काय तर नको त्या पंगतीत जाऊन बसला. वर्ष 2026 सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणार फलंदाज ठरला आहे. एका वर्षात 10 वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्यानेर राशीद खान आणि शदाब खान यांचा नकोसा विक्रम मोडला आहे. राशीद खान आणि शदाब खान टी20 क्रिकेटमध्ये एका वर्षात 9 वेळा शून्यावर बाद झाले आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्येही अभिषेक शर्माने नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने ऑर्किड तुयिसेन्गे, साइम अयुब आणि झॅपी बिमेनिमाना यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. एका वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे खेळाडू सात वेळा शून्यावर बाद झाले आहेत. आता अभिषेक शर्माही त्यांच्यासोबत पंगतीत बसला आहे. अभिषेक शर्माही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 7 वेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रम रचला आहे. अभिषेक शर्माचा चढउतार असलेला हा फॉर्म पाहून त्याचे चाहतेही चिंतेत आहे. खरं तर त्याच्याकडून या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती मात्र तसं झालं नाही.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा