मुंबई : मोबाईल ग्राहकांसाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘टेलिकॉम ग्राहक संरक्षण (तेरावी सुधारणा) नियम, २०२६’ जारी करण्यात आले असून, त्यानुसार दूरसंचार कंपन्यांना केवळ व्हॉइस कॉलिंग आणि SMS सुविधा असलेले रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देणे बंधनकारक असेल. या प्लॅनमध्ये इंटरनेट डेटाचा समावेश नसेल. त्यामुळे ज्यांना मोबाईलवर केवळ कॉलिंग आणि मेसेजिंगची गरज आहे, अशा ग्राहकांना डेटा नसलेला स्वतंत्र रिचार्ज पर्याय मिळू शकणार आहे. (TRAI New Rules 2026)
TRAIच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत बाजारात केवळ कॉलिंग आणि SMS सुविधा असलेल्या प्लॅनची संख्या मर्यादित होती. तसेच कमी वैधतेचे रिचार्ज पर्यायही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हते. ही बाब लक्षात घेऊन ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (TRAI New Rules 2026)
गुजरात : ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा झाल्यानंतर दोन महिन्यांनी, मंगळवारी (२२ सप्टेंबर) गुजरात येथील एकता नगरमध्ये या ...
३० दिवसांच्या रिचार्जसाठी स्वतंत्र प्लॅन
नव्या नियमानुसार, ज्या ग्राहकांना ३० दिवस किंवा त्यापेक्षा कमी मुदतीचा रिचार्ज करायचा आहे, त्यांच्यासाठी दूरसंचार कंपन्यांना व्हॉइस कॉलिंग आणि SMS सुविधा असलेला प्लॅन देणे बंधनकारक असेल. याशिवाय, ग्राहकांना दर महिन्याला एका ठराविक तारखेला रिचार्जचे नूतनीकरण करता येईल, असा पर्यायही कंपन्यांना उपलब्ध करून द्यावा लागेल. त्यामुळे ग्राहकांना प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या तारखांना रिचार्ज करण्याची गरज कमी होईल. (TRAI New Rules 2026)
दीर्घ वैधतेचे प्लॅनही उपलब्ध होणार
केवळ ३० दिवसांच्या रिचार्जपुरताच हा निर्णय मर्यादित नसणार आहे. प्रत्येक दूरसंचार कंपनीला ३० दिवसांपेक्षा जास्त वैधता असलेला किमान एक व्हॉइस कॉलिंग आणि SMS ओन्ली प्लॅन उपलब्ध करून देणे बंधनकारक असेल. त्यामुळे दीर्घ कालावधीसाठी रिचार्ज करू इच्छिणाऱ्या ग्राहकांनाही इंटरनेट डेटाशिवाय प्लॅन निवडता येईल. (TRAI New Rules 2026)
मुंबई : अमरावती जिल्ह्यातील वरूड-मोर्शी तालुक्यांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आढावा घेतला. पीक ...
डेटा नसलेले प्लॅन स्वस्त ठेवण्यावर भर
TRAIने या प्लॅनच्या किमतींबाबतही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. केवळ कॉलिंग आणि SMS सुविधा घेणाऱ्या ग्राहकांना अनावश्यकपणे डेटासाठी पैसे मोजावे लागू नयेत, यासाठी या प्लॅनच्या किमती योग्य प्रमाणात कमी ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. डेटा असलेल्या प्लॅनच्या तुलनेत हे रिचार्ज स्वस्त असावेत, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
एकंदरीत, नव्या नियमांमुळे केवळ कॉलिंग आणि SMS वापरणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार रिचार्ज निवडण्याचा पर्याय मिळणार आहे. विशेषतः इंटरनेट डेटाची आवश्यकता नसलेल्या ग्राहकांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. (TRAI New Rules 2026)





