मुंबई: मुंबई पोलिसांची वॉकी टॉकी घेणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. मुंबई पोलिसांनी आरोपीला मुंबई परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने ...
ऑनलाइन प्रक्रियेला विलंब होत असल्याने तोपर्यंत ऑफलाइन प्रस्ताव स्वीकारण्याचे निर्देश
मंत्रालयातील राणे यांच्या दालनात मंगळवारी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन पोर्टलच्या सद्यस्थितीचा आणि ऑनलाइन प्रक्रियेमुळे निर्माण होणाऱ्या विलंबाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. राज्यात ही योजना प्रभावीपणे आणि वेगाने राबविण्यासाठी ऑनलाइन प्रणालीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ऑफलाइन पद्धतीने प्रस्ताव स्वीकारून त्यावर कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत प्राप्त झालेल्या एकूण प्रस्तावांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. प्राप्त प्रस्तावांनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. योजनेच्या अंमलबजावणीतील अडथळे दूर करून लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळणे आवश्यक असल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.
मुंबई : महाराष्ट्रात समान नागरी कायदा (Uniform Civil Code) (Maharashtra government’s committee ) लागू करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य सरकारच्या विशेष समितीमधून मुंबई उच्च ...
“या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी मी स्वतः प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून योजनेच्या प्रगतीचा आढावा घेणार आहे. मत्स्य व्यवसायाशी संबंधित नागरिक, मच्छीमार आणि लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने गतिमानतेने काम करावे", असे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले. या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यआयुक्त भानुदास पालवे, महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालक भुवनेश्वरी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.