Minor Student Case : शिक्षकी पेशाला काळिमा! अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या 'त्या' नराधम शिक्षकाला बेड्या

मुंबई: शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना मुंबईतील माता रमाबाई मार्ग पोलीस ठाणे हद्दीतून समोर आली आहे. संगणक शिकवणाऱ्या एका २५ वर्षीय शिक्षकाने १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मोहम्मद कैफ मोहम्मद अस्लम शेख असे या नराधम शिक्षकाचे नाव आहे.(Minor Student Case)


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षकाने पीडित विद्यार्थिनीशी जवळीक साधण्यासाठी 'स्नॅपचॅट' या सोशल मीडिया ॲपचा वापर केला. चॅटिंगच्या नावाखाली त्याने मुलीशी संवाद वाढवला आणि नंतर सर्व मर्यादा ओलांडत तिला स्नॅपचॅटवर अश्लील व्हिडिओ पाठवून तिचा विनयभंग केला.



करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी


हा संतापजनक प्रकार कोणाला सांगितल्यास किंवा वाच्यता केल्यास, तुझे शैक्षणिक करिअर पूर्णपणे खराब करेन, अशी धमकी देऊन आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. या सततच्या त्रासामुळे आणि धमक्यांमुळे मुलगी तीव्र मानसिक दबावाखाली होती.


अखेर पीडित मुलीने प्रचंड दाखवत हा सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी तत्काळ माता रमाबाई मार्ग पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध गंभीर कलमांसह 'पॉक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षक मोहम्मद कैफ याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.(Minor Student Case)

Comments
Add Comment

Eknath Shinde : मुंबई-एमएमआरमध्ये पुढील १५ वर्षांत ३० लाख घरे बांधणार

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे भूमिपूजन मुंबई : मुंबईसह महानगर

Nandurbar : अक्कलकुवा नवोदय विद्यालयातील १५ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय

Crime News : ‘जिल्हा केसरी’ पैलवानाची भररस्त्यात हत्या ! जुन्या निवडणूक वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय

Crime News : उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर जिल्ह्यात ३५ वर्षीय ‘जिल्हा केसरी’ पैलवानाची भररस्त्यात हत्या झाल्याची

Mahayuti Seat Sharing : पाच मतदारसंघ, अनेक दावेदार; महायुतीत जागावाटपाची कसोटी

पदवीधर-शिक्षक मतदारसंघांमध्ये हालचालींना वेग; पाचही जागांवर उमेदवारीवरून मित्रपक्षांमध्येच चुरस मुंबई (सुहास

India Canada relations : भारत-कॅनडाचे संबंध सुधारणार? डिसेंबरमध्ये पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंध पुन्हा रुळावर येत असून, एक मोठी बातमी समोर आली आहे.

IPO Investment : एलिवेट कॅम्पसेसचा २,१०० कोटी रुपयांचा आयपीओ खुला; पैसे गुंतवण्याची शेवटची तारीख कोणती?

नवी दिल्ली: शैक्षणिक संस्थांसाठी इन्फ्रास्ट्रक्चरल मॅनेजमेंट सेवा पुरवणाऱ्या एलिवेट कॅम्पसेस लिमिटेड (Elevate Campuses