Wednesday, September 23, 2026

Ketan Agrawal Case : दुख:त कसं रडायचं? Google अन् ChatGPT वर सर्च; लोणावळ्यातील 'ती' घटना सुध्दा अभ्यासली, सिया गोयलच्या सर्च हिस्ट्रीने केली पोलखोल

Ketan Agrawal Case : दुख:त कसं रडायचं? Google अन् ChatGPT वर सर्च; लोणावळ्यातील 'ती' घटना सुध्दा अभ्यासली, सिया गोयलच्या सर्च हिस्ट्रीने केली पोलखोल
पुणे : लोणावळा येथील बहुचर्चित केतन अग्रवाल प्रकरणात आता अनेक अपडेट समोर येत आहेत. पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटनंतर प्रकरणातील अनेक गोष्टींचा खुलासा आहे. आरोपी सिया गोयल हिने हत्येनंतर कुटुंबासमोर अधिक दुःखी आणि व्यथित कसे दिसावे, यासाठी चॅटजीपीटी आणि इतर ऑनलाइन साधनांवर शोध घेतल्याचे समोर आले आहे. ( Ketan Agrawal Case)

ChatGPT ला विचारला तो प्रश्न

केतनचा मृतदेह मिळाल्यानंतर त्याचे कुटुंब लोहगडाच्या पायथ्याशी पोहोचले असता, सियाच्या वर्तनात अपेक्षित दुःख दिसत नसल्याने कुटुंबाला तिच्यावर संशय आला. हा संशय लक्षात आल्यानंतर घरी परतल्यावर सियाने लोकांसमोर भावनिकदृष्ट्या कसे कोसळावे आणि शोक कसा व्यक्त करावा, याची माहिती ChatGPT आणि इंटरनेटवर शोधल्याचे डिजिटल पुराव्यांवरून उघड झाले आहे.

केतनची मर्डर मिस्ट्री

या गुन्ह्याचा कट रचताना सियाने तिच्या साथीदारांसह पूर्वतयारी केली होती. तिने लोणावळा परिसरातील कड्यावरून पडून झालेल्या अपघातांचा आणि मेघालयातील गाजलेल्या राजा रघुवंशी हत्येचा सखोल अभ्यास केला होता. गुन्ह्याची पद्धत, पोलिसांचा तपास आणि आरोपींपर्यंत पोहोचणारे धागेदोरे समजून घेण्यासाठी आरोपींनी इंटरनेटचा वापर केला. ( ChatGPT Search History)
तपासादरम्यान असे दिसून आले की, १८ जून २०२६ रोजी केतनला लोहगड किल्ल्यावर नेऊन तिथून खाली ढकलून देण्यात आले. आरोपींना सुरुवातीला वाटले होते की ते पोलिसांच्या जाळ्यात अडकणार नाहीत. मात्र नंतर भीती वाटू लागल्यावर, अटक झाल्यास चौकशीदरम्यान कसे वागावे आणि घाबरून न जाता परिस्थिती कशी हाताळावी, याचेही उत्तर त्यांनी ऑनलाइन शोधले होते. ( Police Chargesheet)
सियाने तिचा प्रियकर चेतन चौधरी आणि त्याचा मित्र रितेश हांगे यांच्यासोबत इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि स्नॅपचॅटवरून या सर्व माहितीची देवाणघेवाण केली होती. पोलिसांनी आरोपींच्या मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून हे सर्व डिजिटल पुरावे जप्त करून न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात जोडले आहेत. अशातच पुण्यात यापूर्वी घडलेल्या हत्याकांडांचा आणि लोणावळा परिसरातील दरीत पडून झालेल्या मृत्यूंचाही सखोल अभ्यास केल्याचे तपासात समोर आले आहे. सियाच्या गूगल हिस्ट्रीवरून मानसी गोविंदपूरकर नावाच्या तरुणीची माहित मिळाली. सिया या अनेक केसेचा सखोल अभ्यास करत होती असा संशय समोर येत आहे. टायगर पॉइंट तसेच लोहगड परिसरात मानसी गोविंदपूरकर तरुणीचा पडून मृत्यू झाल्याच्या घटनांची माहिती आरोपींनी शोधली गेली होती.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >