जसप्रीत बुमराहची 'जपानी उशी' सोशल मीडियावर चर्चेत! काय आहे खासियत

भारतीय पुरूष संघ एशियन गेम्स 2026 स्पर्धेसाठी जापान दौऱ्यावर आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाने जापान विरुद्ध मैत्रिपूर्ण सामना खेळला. हा सामना भारताने अवघ्या 2 धावांनी जिंकला. पण जापान संघाने भारतीय संघाला विजयासाठी चांगलंच झुंजवलं. त्यामुळे जापान संघाचं क्रीडाविश्वात कौतुक होत आहे. आता एशियन गेम्स स्पर्धेसाठी भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे. दुसरीकडे, जापान दौऱ्यावर गेलेला भारतीय संघ तिथल्या संस्कृतीबाबत जाणून घेण्यास प्रचंड उत्सुक आहे. त्यामुळे या दौऱ्यात जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा भारतीय संघाचे खेळाडू जापान फिरण्याचा आनंद लुटत आहे. या दरम्यान जसप्रीत बुमराह जापानमध्ये शॉपिंगसाठी गेला होता. यावेळी त्याच्यासोबत संघ सहकारी अक्षर पटेलही होता. यावेळी जसप्रीत बुमराहने उशी खरेदी केली. पण तत्पूर्वी त्याच्या झोपण्याची पद्धत आणि पोश्चरची चांगल्या प्रकारे तपासणी केली गेली. हा सर्व प्रकार पाहून जसप्रीत बुमराहला आश्चर्याचा धक्का बसला.

जसप्रीत बुमराहच्या उशीत काय आहे खास?


स्पेशल उशी खरेदी करण्यापूर्वी जसप्रीत बुमराहची तपासणी कशी केली गेली, याचा पूर्ण व्हिडीओ अक्षर पटेलने चित्रित केला आहे. जसप्रीत बुमराहने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला असून वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, जापानमध्ये एखादी वस्तू विकताना त्याची किती काळजी घेतली जाते.  त्यामुळे ती वस्तू खास असणारच, ही भावना पहिल्यांदा मनात येते. आता जसप्रीत बुमराहने खरेदी केलेल्या उशीत काय खासियत आहे? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. तर ही उशी जसप्रीत बुमराहची मानेचं पोश्चर आणि त्याचं मोजमाप करून तयार केली आहे. दुसरं म्हणजे, या उशीवर झोपल्याने जसप्रीत बुमराहला लोअर बॅक पेन आणि दुखापतीची शक्यताही कमी असेल.




उशीवरून संजना गणेशनने केली मजेशीर पोस्ट


जसप्रीत बुमराहने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओवर पत्नी संजना गणेशन हीने मजेशीर पोस्ट केली आहे. तिने लिहिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. संजनाने सुरुवातीला विचारले, "यासाठीच का तुम्ही जापानला गेला होतात?" त्यावर जसप्रीत बुमराहने उत्तर दिले की, "तू मागितल्यावर मी तुला उशी देणार नाही."

 

 
Comments
Add Comment

Josh Tongue : इंग्लंड संघाला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून ऐनवेळी बाहेर; क्रिकेट विश्वात खळबळ

इंग्लंड क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या अगदी तोंडावर मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा प्रतिभावान वेगवान

अखेर तो प्रयोग फसला! तरीही सुनील गावस्कर म्हणतात, 'यात काहीही चुकीचे नव्हते...'

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 135 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अत्यंत

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतून हार्दिक पांड्या बाहेर; पुनरागमन लांबणीवर!

आगामी सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताचा स्टार

IPL 2027 Trade News: हार्दिक पांड्याची मुंबईला सोडचिठ्ठी! पंजाब किंग्समध्ये नवी एंट्री, अर्शदीप MI मध्ये

आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी क्रिकेट चाहत्यांना थक्क करणारी बातमी समोर आली आहे. फ्रँचायझी क्रिकेटच्या

मैदानावर हे सोपे नव्हते...! दुसऱ्या वनडे सामन्यातील विजयानंतर कर्णधार शुभमन गिल काय म्हणाला?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने विजय

IND vs NZ, 2nd ODI: भारताने न्यूझीलंडला 4 धावांनी नमवलं, पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने आघाडी

भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडला 5 गडी राखून पराभवाची धूळ चारली. तसेच पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत