मुंबई : राज्यातील लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अनुदान पॅकेजअंतर्गत भजनी मंडळांना अनुदान देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी समारे २ हजार भजनी मंडळांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी केली. (Bhajan Mandal Government Grant)
महाराष्ट्रातील पात्र भजनी मंडळांना या योजनेचा लाभ मिळणार असून, अर्ज प्रक्रिया केवळ ऑनलाइन पद्धतीने mahaanudan.org या संकेतस्थळावर करण्यात येणार आहे. पात्र मंडळांची निवड ‘प्रथम अर्ज – प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर केली जाणार आहे. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत २३ सप्टेंबर २०२६ ते २२ ऑक्टोबर २०२६ अशी आहे. पात्र भजनी मंडळांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केले आहे. (Bhajan Mandal Government Grant)
मुंबई: महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. मात्र, याच उत्सवाच्या वातावरणात ध्वनिप्रदूषण आणि वायू ...
पात्रतेचे निकष काय?
- एका वर्षात किमान ४० कार्यक्रम सादर करणारे व पूर्ण वेळ व्यवसाय करणारे भजनी मंडळ असावे.
- भजनी मंडळामध्ये किमान १५ सदस्य असावेत.
- एकदा अनुदान मिळाल्यानंतर संबंधित संस्था किमान ३ वर्षांनंतर पुन्हा अनुदानासाठी अर्ज करू शकते.
- एका पथकास या अनुदानाचा लाभ जास्तीत जास्त दोन वेळा अनुज्ञेय असेल. (Bhajan Mandal Government Grant)