Ganesh Visarjan 2026: गणेश विसर्जनासाठी नवी मुंबई पोलिसांचा बंदोबस्त; 2000 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना

नवी मुंबई: गणपती विसर्जनासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये 1044 सार्वजनिक आणि 1,02,369 घरगुती गणपती बाप्पांची स्थापना करण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीसाठी पोलिसांनी सात पोलीस उपआयुक्त, 10 पोलीस सहायक आयुक्त, 65 पोलीस निरीक्षक आणि 229 सहायक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्यासह 2032 कर्मचारी तैनात केले आहेत. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी शहरभर आणि विसर्जन स्थळांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन, बॉम्ब शोधक, निकामी पथके आणि विशेष दले तैनात करण्यात आली आहेत.



नवी मुंबईमध्ये 2 हजारांपेक्षा अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून एसआरपीएफ, क्यूआरटी, फोर्स वन, शीघ्र कृती दल यांचे पथक राखीव ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड, पाच, सहा आणि सात दिवसांच्या गणेश मूर्तींचे आणि 7104 गौरी मूर्तींचे विसर्जन आतापर्यंत शांततेत पार पडले आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी अनेक उपाययोजना केल्या आहेत. नियमित पोलीस बंदोबस्ताव्यतिरिक्त, 20 स्ट्राइकिंग फोर्स, दंगल नियंत्रण पोलिसांची (आरसीपी) दोन पथके, जलद प्रतिसाद पथके (क्यूआरटी), 113 होमगार्ड, 148 वॉर्डन आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.


नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत, जवळपास 2000 घरगुती आणि 25 सार्वजनिक गणेश मूर्तींचे 10 प्रमुख विसर्जन स्थळांवर विसर्जन केले जाणार आहे. वाशी- जागृतेश्वर मंदिर तलाव, तुर्भे तलाव, कोपरखैरणे खाडी तलाव, नेरुळ- चिंचोली तलाव, करावे गावातील तलाव, दरावे गावातील तलाव, सीबीडी-अग्रोली तलाव, ऐरोली नाका तलाव, रबाळे- ऐरोली सेक्टर २० खाडी तलाव आणि दिघा तलाव यांचा समावेश आहे. तर, पनवेल आणि उरणमध्ये कामोठे सेक्टर 15 तलाव, कळंबोली- रोडपाली तलाव, खारघर- स्पॅगेटी तलाव, पनवेल- वडघर खाडी आणि उरणमधील विमला तलाव येथील विसर्जन घाटांवर सुमारे 900 घरगुती आणि 10 सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे.



पोलीस आयुक्तालयाने 16 विसर्जन स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. उर्वरित विसर्जन स्थळांवर संबंधित स्थानिक पोलीस ठाण्यांनी आणि स्थानिक नागरी संस्थांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. पोलीस सीसीटीव्ही कमांड अँड कंट्रोल सेंटर तसेच ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवतील. नवी मुंबई पोलिसांचे प्रशिक्षित बॉम्ब शोधक आणि निकामी पथक विसर्जन स्थळांवर आणि मिरवणूक मार्गांवर तैनात करण्यात आले आहे. शुक्रवारी विसर्जन मिरवणूक सुरू होण्यापूर्वी बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाकडून सर्व विसर्जन स्थळांची तपासणी केली जाईल. पोलिसांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ध्वनी प्रदूषण विरोधी पथकांची स्थापन केली आहे.


सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना ध्वनी पातळी मापक यंत्रे चालवण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. ही पथके अनंत चतुर्दशीच्या दिवशी ध्वनी पातळीवर लक्ष ठेवतील आणि निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाई करतील. "गणेश विसर्जन सोहळा शांततेत पार पडावा यासाठी शहरभर आणि विसर्जन स्थळांवर सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भाविकांनी शांततेत मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन आम्ही करतो. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे," असे पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा) योगेश चव्हाण यांनी सांगितले.

Comments
Add Comment

दिशा सालियन प्रकरणातील पुरावे सीबीआयकडे सुपूर्द, वडील सतीश सालियन यांच्याकडून पेन ड्राइव्ह जमा; दोषींवर तातडीने कारवाईची मागणी

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूशी संबंधित पुरावे असलेला पेन

IIT Bombay Mid Sem Exam : आयआयटी मुंबईच्या मध्य-सत्र परीक्षा 10 आणि 11 ऑक्टोबरला; विद्यार्थी आंदोलनानंतर संस्थेचा मोठा निर्णय

मुंबई: आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये बीटेकच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या दुर्दैवी

MPCB new rules : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्करचनेत पुन्हा बदल

सांडपाण्याच्या प्रमाणानुसार वार्षिक शुल्क; सूक्ष्म, लघुउद्योगांसह बांधकाम, आरोग्य आस्थापना आणि जनरेटरसाठी नवी

Goregaon Fire : गोरेगावमध्ये 8व्या मजल्यावरील घराला आग; परिसरात खळबळ

एसीच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज मुंबई : मुंबईतील गोरेगाव पश्चिम परिसरात गुरुवारी सकाळी

BMC Action : झोपड्यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईबाबत स्थायी समितीत तीव्र नाराजी

तुघलकीय निर्णय नको,लोकप्रतिनिधींशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घ्या! मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका

Malabar Hill Reservoir : मलबार हिल टेकडीवर नवीन जलाशय, पण ३०८ झाडे वाचवून

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मलबार टेकडी जलाशय टाकीचे बांधकाम तोडून त्याठिकाणी नव्याने जलाशय उभारताना