Thursday, September 24, 2026

Bigg Boss 20 : ‘बिग बॉस 20’ची डिजिटलवर मोठी झेप ! सलमान खानचं 'ते' वक्तव्य अन् 2 कोटी व्ह्युअर्सचा टप्पा पार

Bigg Boss 20 : ‘बिग बॉस 20’ची डिजिटलवर मोठी झेप ! सलमान खानचं 'ते' वक्तव्य अन् 2 कोटी व्ह्युअर्सचा टप्पा पार

Bigg Boss 20 : ‘बिग बॉस 20’ सुरू होऊन काही दिवसच झाले असले तरी या सीझनची चर्चा चांगलीच रंगली आहे. आता या चर्चेला डिजिटल व्ह्युअरशिपच्या आकडेवारीचीही जोड मिळाली आहे. ‘बिग बॉस 20’ने एका आठवड्यात तब्बल 2 कोटी युनिक व्ह्युअर्सचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, 2026 मध्ये एका आठवड्यात 20 मिलियनहून अधिक युनिक व्ह्युअर्स मिळवणारा हा पहिला नॉन-क्रिकेट कंटेंट ठरल्याचं सांगितलं जात आहे.

16.8 मिलियनवरून थेट 20 मिलियनच्या पुढे

‘ओरमॅक्स मीडिया’च्या स्ट्रीम व्ह्यू डेटानुसार, 20 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात ‘बिग बॉस 20’ला 2 कोटींपेक्षा जास्त युनिक व्ह्युअर्स मिळाले. याआधी 7 ते 13 सप्टेंबर या कालावधीत शोची व्ह्युअरशिप 16.8 मिलियन होती. मात्र पुढील आठवड्यात या आकड्यात मोठी वाढ झाली आणि प्रेक्षकसंख्या 20 मिलियनच्या पुढे पोहोचली. म्हणजेच अवघ्या एका आठवड्यात 3.2 मिलियनपेक्षा अधिक युनिक व्ह्युअर्सची वाढ झाली आहे. या आकडेवारीत 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ शो पाहणाऱ्या भारतीय युनिक प्रेक्षकांचा समावेश आहे.

सलमान खानच्या वक्तव्याचीही चर्चा

दरम्यान, ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने केलेल्या वक्तव्यामुळेही शो चर्चेत आला. ऑनलाइन ट्रोलिंग आणि बॉडी शेमिंगच्या मुद्द्यावर बोलताना सलमानने स्वतःच्या अनुभवाचा दाखला दिला.वय, वजन आणि लूकमध्ये झालेल्या बदलांवर सोशल मीडियावर होणाऱ्या कमेंट्सचा उल्लेख करत त्याने एखाद्या व्यक्तीच्या शरीरयष्टीवरून किंवा वयावरून त्याची खिल्ली उडवण्याला विरोध केला. यावेळी सलमानने कॅप आणि जॅकेट काढून आपली शरीरयष्टीही दाखवली.

महिलांच्या शरीरावर होणाऱ्या ट्रोलिंगवरही भाष्य

सलमानने महिलांच्या शरीरातील नैसर्गिक बदलांवरून होणाऱ्या ट्रोलिंगचाही मुद्दा उपस्थित केला. आई झाल्यानंतर महिलांच्या शरीरात बदल होणे स्वाभाविक असल्याचं सांगत, केवळ दिसण्यावरून एखाद्या महिलेवर कमेंट करणे योग्य नसल्याचं त्याने म्हटलं. सलमानने कोणत्याही अभिनेत्रीचं नाव घेतलं नाही. मात्र, सोशल मीडियावर अभिनेत्री कतरिना कैफच्या पोस्ट-प्रेग्नन्सी लूकवरील ट्रोलिंगशी त्याच्या वक्तव्याची सांगड घातली जात आहे.

सुरुवातीपासूनच चर्चेत ‘बिग बॉस 20’

‘बिग बॉस 20’चा प्रीमियर 6 सप्टेंबर 2026 रोजी झाला. हा शो कलर्स टीव्हीवर प्रसारित होत असून जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम केला जात आहे. आता डिजिटल प्लॅटफॉर्मवरील 2 कोटींपेक्षा अधिक युनिक व्ह्युअर्सचा टप्पा पार केल्याने या सीझनच्या लोकप्रियतेची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >