Maharashtra weather : पावसाची पुन्हा जोरदार एन्ट्री! मुंबई, ठाण्यासह 'या' भागांत मुसळधार पावसाचा अंदाज; प्रशासनाकडून अलर्ट जारी

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर दिसून येत आहे. राज्यातील अनेक भागांत पुन्हा पावसाचा जोर वाढला असून, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने 24 सप्टेंबरसाठी राज्यातील 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. काही ठिकाणी ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.


कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे काही ठिकाणी हलका ते मध्यम, तसेच जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत अलर्ट नसला तरी काही भागांत हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात.



उत्तर महाराष्ट्रात धुळे आणि नंदुरबारमध्ये प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. जळगावला यलो अलर्ट असून, जोरदार पावसासह 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. नाशिकमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.


अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर आणि सातारा घाटमाथा परिसराला यलो अलर्ट देण्यात आला असून, काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याचा अंदाज आहे.


मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे, विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाची शक्यता आहे.


विदर्भात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, वर्धा आणि वाशिमला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूरला ऑरेंज अलर्ट असून काही भागांत जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.


पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागांत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर हवामानात पुन्हा बदल होण्याचा अंदाज असून, नागरिकांनी पावसाच्या स्थितीनुसार खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Comments
Add Comment

Pune Metro : पुणेकरांची मेट्रोची प्रतीक्षा वाढली; हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटने पुन्हा लांबणीवर

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासोबतच हिंजवडी आयटी पार्कमधील हजारो कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या

Kolhapur Accident News: कानातील इअरबड्स ठरले जीवघेणे ! रेल्वे रुळावर इअरबड्स लावले अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं ; 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Kolhapur Accident News : रेल्वे रुळावरून चालताना मोबाईलवर बोलणे आणि कानात इअरबड्स असणे एका १७ वर्षीय तरुणीच्या जीवावर

Pune Cyber Crime : डिजिटल अरेस्टचा धक्कादायक प्रकार! पुण्यातील 74 वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याला 1.28 कोटींचा गंडा

पुणे : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सायबर भामट्यांनी पुण्यातील ७४ वर्षीय निवृत्त सरकारी अधिकाऱ्याची तब्बल 1 कोटी 28

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'चा ऑगस्टचा हप्ता लवकरच खात्यात? २४ सप्टेंबरनंतर पैसे मिळण्याची शक्यता

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ऑगस्ट महिन्याच्या १,५०० रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या

Bhajan Mandal Government Grant : राज्यातील भजनी मंडळांना अनुदानाची योजना, २३ सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

मुंबई : राज्यातील लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अनुदान पॅकेजअंतर्गत भजनी

Nitesh Rane : दुष्काळामुळे मत्स्यव्यवसाय संकटात? जलस्रोतांची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने अहवाल सादर करा; मंत्री नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा मत्स्यव्यवसायावर होणारा परिणाम लक्षात घेता, ‘दुष्काळ