Wednesday, September 23, 2026

आयपीएल 2027 चा महासंग्राम! भारतात 'या' शहरात पार पडणार मिनी लिलाव प्रक्रिया; तारीख आणि वेन्यू फायनल!

आयपीएल 2027 चा महासंग्राम! भारतात 'या' शहरात पार पडणार मिनी लिलाव प्रक्रिया; तारीख आणि वेन्यू फायनल!
आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सर्वच फ्रेंचायझींची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. प्रत्येक फ्रेंचायझी आपला संघ सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. असं असताना सर्वांच्या नजरा या या स्पर्धेपूर्वी होणाऱ्या मिनी ऑक्शनकडे लागल्या आहेत. कारण ट्रेड विंडोतून पडद्यामागे चर्चा सुरू आहेत. तर इतर खेळाडूंसाठी मिनी लिलावातच बोली लावावी लागणार आहे. असं असताना आयपीएल स्पर्धेच्या 20व्या पर्वापूर्वी होणाऱ्या मिनी ऑक्शनची अधिकृतपणे घोषणा झाली आहे. मागच्या तीन वर्षांपासून आयपीएलची लिलाव प्रक्रिया विदेशात होत होती. मात्र आता ही लिलाव प्रक्रिया भारतात होणार असल्याने उत्सुकता आहे. पण कुठे होणार आणि तारीख काय? याबाबत काहीच माहिती नव्हतं. अखेर याबाबतचा खुलासा झाला आहे. आयपीएलचे चेअरमन अरूण सिंह धूमल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यंदा मिनी लिलावाचं आयोजन गोव्यात करण्यात आलं आहे. यासह त्यांनी ही लिलाव प्रक्रिया कधी पार पडणार याबाबतही खुलासा केला आहे.

कधी होईल आयपीएल 2027 मिनी लिलाव?

आयपीएल 2024, 2025 आणि 2026 लिलाव प्रक्रिया विदेशात पार पडली होती. दुबई, जेद्दा आणि अबू धाबीत खेळाडूंवर बोली लागली होती. चेअरमन अरूण धूमल यांनी सांगितलं की, बोर्डाने विचार करूनच यंदाची लिलाव प्रक्रिया भारतात करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नसराईच्या काळात मोठ्या शहरातील हॉटेल आणि ठिकाणांची मोठी मागणी असते. त्यात मिनी ऑक्शन फार वेळखाऊ नसते. त्यामुळे गोवा हे ठिकाण निवडलं गेलं आहे. आयपीएलचे चेअरमन अरुण सिंह धूमल यांच्या मते, लिलावासाठी डिसेंबरच्या तारखेचा विचार केला गेला आहे. याचं आयोजन 15 ते 16 डिसेंबरच्या आसपास होण्याची शक्यता आहे. मिनी लिलाव असल्याने खेळाडूंवर बोली लावण्याची प्रक्रिया एका दिवसात संपून जाणार आहे.

एका दिवसात संपणार लिलाव प्रक्रिया

आयपीएल स्पर्धेत दर तीन वर्षांनी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडत असते. आयपीएल 2025 मध्ये मेगा लिलाव झाला होता. त्यानंतर आयपीएल 2026 साठी मिनी लिलाव झाला होता. आता आयपीएल 2027 साठी मिनी लिलाव होणार आहे. मेगा लिलावात शेकडो खेळाडूंवर बोली लागते. त्यामुळे त्याला ती प्रक्रिया वेळखाऊ असते. तसं मिनी लिलावात नसतं. मिनी लिलावात आधीच संघ बांधलेला असतो आणि त्यात दोन तीन खेळाडूंची मिनी लिलावातून भरणा केली जाते.  दहा फ्रेंचायझी आपल्या संघातील रिकाम्या या लिलाव प्रक्रियेतून भरतील.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >