नाशिकमध्ये उमर खालिदवरील माहितीपटाच्या स्क्रीनिंगवरून वाद; भाजपकडून तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा

नाशिक : कुंभ नगरी नाशिकमध्ये देशविरोधी मानसिकता असल्याचा आरोप असलेल्या आणि देशद्रोहाच्या गुन्ह्यात असलेल्या उमर खालिदचे महिमामंडन करणारी माहितीपट (डॉक्युमेंटरी) काही संघटनांद्वारे प्रदर्शित केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावर भारतीय जनता पक्षाने (भाजप) तीव्र संताप व्यक्त केला असून, हे स्क्रीनिंग तातडीने थांबवण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.


भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अजित चव्हाण यांनी या प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. भारताच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचवणाऱ्या आणि देशद्रोहाचा आरोप असलेल्या व्यक्तीला 'हिरो' म्हणून पुढे आणणाऱ्या संघटनांचा त्यांनी धिक्कार केला आहे.


?si=n8dVO9C6wx4dMI-0
"देशविरोधी मानसिकता असलेल्या आणि देशद्रोहाचा आरोप असलेल्या उमर खालिदचे महिमामंडन करणारी डॉक्युमेंटरी कुंभ नगरी नाशिकमध्ये काही संघटनांद्वारे प्रदर्शित केली जाणार आहे. आम्ही नाशिक पोलिसांना हे स्क्रीनिंग थांबवण्याची विनंती केलेली आहे. असं झालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू. भारताच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचवणाऱ्या उमर खालिदला हिरो म्हणून पुढे आणणाऱ्या संघटनांचा देखील मी तीव्र शब्दांमध्ये धिक्कार करतो."

— अजित चव्हाण, प्रवक्ता, भाजप, महाराष्ट्र

प्रशासनाने या प्रकरणी तातडीने दखल घेऊन स्क्रीनिंग रद्द करावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

Vasai News : मित्रांसोबत फुटबॉल खेळायला गेला, पण घरी परतलाच नाही; अखेर 12 दिवसांनी अंकितचा मृतदेह सापडला

वसई : गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी सुरुची बीचवर मित्रांसोबत फुटबॉल खेळण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय अंकित

Nandurbar Ganesh Visarjan 2026 : नंदुरबारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, ‘हरिहर भेटी’कडे भाविकांचे लक्ष

Nandurbar Ganesh Visarjan 2026 : नंदुरबार शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. प्रथम मानाचा गणपती

मुंबईतील भुलेश्वर परिसरात इमारतीला भीषण आग; गच्चीवर एक व्यक्ती अडकली, अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू

मुंबई : शुक्रवार, 25 सप्टेंबर रोजी मुंबईतील गजबजलेल्या भुलेश्वर परिसरामध्ये एका व्यावसायिक-निवासी इमारतीला

ब्रह्मांडाच्या एका अथांग कोपऱ्यातून पृथ्वीवर आला रेडिओ सिग्नल; शास्त्रज्ञही चक्रावले, त्या ग्रहावर आहे तरी काय?

पृथ्वीपलीकडील जगाबाबत मानवी संस्कृतीत कायमच आकर्षण राहिलं आहे. या पृथ्वीबाहेरही जग आहे का? असं कायम मनात वाटत

Nashik Ganesh Visarjan 2026 : पुढच्या वर्षी लवकर या ! नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

Nashik Ganesh Visarjan 2026 : साश्रूनयनांनी आज लाडक्या बाप्पााला निरोप देण्यात येत आहे. अनेक मंडळांची विसर्जनाची तयारी सुरू झाली

Cm Devendra Fadanvis News: माथाडी कायदा कायम राहणार, वडाळ्यात कामगारांना मिळणार ३ हजार घरे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

ठाणे: माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण देणारा ऐतिहासिक माथाडी कायदा कोणत्याही