Friday, September 25, 2026

Crime News : ठाण्यात PSI ची निर्घृण हत्या, रात्री गस्त घालायला गेले अन् नको ते घडलं ; दारू पिण्यावरून...

Crime News : ठाण्यात PSI ची निर्घृण हत्या, रात्री गस्त घालायला गेले अन् नको ते घडलं ; दारू पिण्यावरून...

Crime News : ठाणे शहरातून पोलीस दलाला हादरवणारी घटना समोर आली आहे. रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असताना गस्त घालणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याची गावगुंडाने निर्घृण हत्या केल्याच धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस उपनिरीक्षक (PSI) किसन भोईर असं हत्या झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी मुख्य संशयित राजू वाल्मिकी याला ताब्यात घेतले आहे.

गस्तीवर असताना काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार, PSI किसन भोईर हे रात्रीच्या सुमारास परिसरात गस्त घालत होते. यावेळी काही दारूची दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे भोईर संबंधित परिसरात कारवाईसाठी गेले होते. यावेळी राजू वाल्मिकी हा सार्वजनिक ठिकाणी दारू पित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला हटकून पोलीस वाहनात बसण्यास सांगितले.

पोलीस अधिकाऱ्यासोबत वाद

पोलीस वाहनात बसण्याच्या कारणावरून आरोपी राजू वाल्मिकी आणि पीएसआय किसन भोईर यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. या बाचाबाचीदरम्यान संतप्त झालेल्या गावगुंड राजू वाल्मिकीने पीएसआय भोईर यांना अत्यंत जोरात धक्का दिला. या अचानक दिलेल्या तीव्र धक्क्यामुळे किसन भोईर यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर थेट डोक्यावर आदळले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पीएसआय किसन भोईर यांचा दुर्दैवाने जागीच मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आहे.

संशयिताला पोलिसांकडून ताब्यात

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत राजू वाल्मिकी याला ताब्यात घेतले. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने पोलीस दलात आणि परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेमागील संपूर्ण परिस्थिती आणि वाद नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >