Maharashtra Government : गणेशोत्सवात २९ लाखांहून अधिक भाविकांची आरोग्य तपासणी; ५३ हजारांहून अधिक शिबिरांचे आयोजन

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा मिळावी, यासाठी राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दहा दिवसांत राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ५३ हजार ८६२ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये तब्बल २९ लाख ७७ हजार ६७० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. (Maharashtra Government)


मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. सार्वजनिक आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य यंत्रणा, शासकीय व निमशासकीय संस्था, सार्वजनिक गणेश मंडळे आणि सामाजिक संस्थांनी या उपक्रमात सहभाग घेतला.



गणेश मंडपांसह महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामीण भागातही आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये हृदयरोग, किडनीविकार, कर्करोग, मधुमेह, संसर्गजन्य आजार, मेंदूविकार आणि बालरोग यांसह विविध आजारांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. आरोग्यविषयक समस्या आढळलेल्या नागरिकांना पुढील तपासणी आणि उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टर व संबंधित रुग्णालयांकडे पाठविण्यात आले. (Maharashtra Government)


विभागनिहाय पाहता, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ७ लाख ६६ हजार ७६२ नागरिकांची, तर विदर्भात ५ लाख ९४ हजार ६३६ आणि मराठवाड्यात ४ लाख ५६ हजार ८६३ नागरिकांची तपासणी झाली. पुढील उपचारांसाठी ५ हजार ९९३ रुग्णांना संदर्भित करण्यात आले.



पात्र रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच इतर शासकीय आरोग्य योजनांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. विविध यंत्रणा, गणेश मंडळे, सामाजिक संस्था आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून हा उपक्रम व्यापक स्तरावर राबविण्यात आला. (Maharashtra Government)


















Comments
Add Comment

Chandigarh Crime : ‘२१ वर्षांनंतरच लग्न कर’ म्हणताच वाद शिगेला पोहोचला; प्रेयसीसोबत लग्नाच्या हट्टातून हेड कॉन्स्टेबल वडिलांची हत्या, १८ वर्षीय मुलगा अटकेत

चंदीगड : लग्नाच्या मुद्द्यावरून झालेल्या कौटुंबिक वादानंतर चंदीगड पोलिसांच्या हेड कॉन्स्टेबलची गोळ्या झाडून

Mumbai News: सोनं तस्करीची भन्नाट शक्कल! खाद्यपदार्थांच्या पाकिटांत लपवलं 9.40 किलो सोनं; तिघे अटकेत

मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (Directorate of Revenue Intelligence- DRI) मुंबई विभागाने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. एक्स्प्रेस वेवरील किलोमीटर 36 जवळ मुंबईच्या

Siddharth Jadhav New Movie : ‘हुप्पा हुय्या’नंतर सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा दिसणार हनुमान भक्ताच्या भूमिकेत; ‘बजरंगी’ चित्रपटाचा फर्स्ट लुक चर्चेत

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा हनुमान भक्ताच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या

IND vs WI: पहिल्या वनडेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! प्लेइंग 11 मध्ये होणार मोठे बदल, कारण की...

भारत आणि वेस्ट इंडिया यांच्यातील पहिला वनडे सामना 27 सप्टेंबरला होत आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार सराव

Crime News : कुटुंबात वाद होताच पोलीस कर्मचारी घरातून निघून गेला अन्... पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ

Crime News : गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने सेवा पिस्तुलातून