Nashik Crime: गुंडा विरोधी पथकाने नाशिकमध्ये शस्त्रविक्रीचा डाव उधळला; तिघे ताब्यात, 2.15 लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक: नाशिक शहरामध्ये दिवसाढवळ्या गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे विक्रीसाठी आणणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. ही उल्लेखनीय कामगिरी नाशिकच्या गुंडा विरोधी पथकाकडून करण्यात आली आहे. 25 सप्टेंबरच्या रात्री (शुक्रवारी) शहरामध्ये गस्ताला असताना गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार कल्पेश जाधव यांना, पंचवटी- मखमलाबाद रोडवरील घाडगे नगर परिसरामध्ये तीन इसम गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याच आधारावर पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसांमध्येच पोलिसांनी नाशिक शहरामध्ये एवढी मोठी कारवाई केल्यामुळे सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.



गावठी कट्टे विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांनी कारवाईचे चक्रे फिरवले. गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी संदिप पवार यांनी तात्काळ तीन वेगवेगळे पथक तयार करुन घाडगे नगर परिसरात सदर इसमांचा शोध घेण्यासाठी रवाना केले असता मिळालेल्या बातमीप्रमाणे घाडगे नगर येथील मोकळ्या जागी, वडजाई माता नगरच्या समोर, पंचवटी-मखमलाबाद रोड, नाशिक येथे तीन संशयीतांना सापळा रचुन शिताफीने ताब्यात घेतले. हे तिन्ही आरोपी पंचवटी आणि मखमलाबाद रोड परिसरातीलच आरोपी आहेत. गुंडा विरोधी पथकाने आरोपींकडून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.



गुंडा विरोधी पथकाने तिन्ही तरूण आरोपींच्या कमरेला प्रत्येकी एक गावठी कट्टा (अग्निशस्त्र) व एक जिवंत काडतुस असे एकुण ३ गावठी क‌ट्टे (अग्निशस्त्रे) व ३ जिवंत काडतुसे असा एकुण २ लाख १५ हजार रुपयांचा मुद्येमाल मिळाल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाणे येथे आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तिन्ही आरोपी तरूण असल्यामुळे पोलिसांनी केलेल्या ह्या कारवाईची चांगलीच चर्चा होत आहे. नाशिकमधील सध्याची तरूणाई करियरकडे न वळता गुन्हेगारीकडे वळत असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाने आरोपींवर कारवाई केली आहे.



गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरिक्षक संदिप पवार, सह पोलीस उप निरिक्षक सुनिल आडकेंसह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींवर कारवाई केली आहे. नाशिक शहरातील तरूणाई इतक्या कमी वयामध्ये करियरकडे फोकस न करता गुन्हेगारी वळत असल्यामुळे शहरामध्ये गुन्हेगारी अधिक वाढण्याची शक्यता आहे. शहरामध्ये हल्लीच्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारींचे प्रमाण वाढले आहे. हेच गुन्हेगारींचे प्रमाण लक्षात घेता शहरातील गुन्हेगारांना व्यवस्थित वठणीवर आणण्याचे काम नाशिक पोलिसांवर असणार आहे. किती दिवसांमध्ये नाशिक शहरातील गुन्हेगारी कमी होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Comments
Add Comment

Eknath Shinde : दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेना देणार मदतीचा हात

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; स्थानिक लोकप्रतिनीधी आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. एक्स्प्रेस वेवरील किलोमीटर 36 जवळ मुंबईच्या

Crime News : कुटुंबात वाद होताच पोलीस कर्मचारी घरातून निघून गेला अन्... पिंपरी चिंचवड पोलीस दलात खळबळ

Crime News : गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने सेवा पिस्तुलातून

Chandrashekhar Bawankule : दुष्काळाचा पंचनामा शेतकऱ्यांसमोरच होणार - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

विकासकामांऐवजी शेतकरी प्राधान्यक्रमावर, परिस्थितीनुसार मदतीचे स्वरूप बदलणार मुंबई : दुष्काळी परिस्थितीत

DCM Sunetra Pawar News: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून परभणी जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी, शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्या व्यथा

परभणी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी दुष्काळग्रस्त भागाचा

ST Bus NCMC Card : ज्येष्ठ नागरिक-महिलांसाठी महत्त्वाची बातमी ! १ ऑक्टोबरपासून ST बसच्या सवलतीसाठी NCMC कार्ड अनिवार्य

ST Bus NCMC Card : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक,