Panchayat Series: 'मिर्झापूर'नंतर 'पंचायत' सीरीजचाही चित्रपट बनणार का? 'प्रधान जी'ने दोन वाक्यातच सर्व काही सांगितलं...

मुंबई: ओटीटी गाजवल्यानंतर बॉक्स ऑफिसवर 'मिर्झापूर: द मुव्ही' चित्रपट रिलीज झाला होता. ओटीटी प्रमाणेच त्याला बॉक्स ऑफिसवरही चांगलेच सक्सेस मिळाले होते. आता 'मिर्झापूर'नंतर 'पंचायत' वेबसीरिजचाही चित्रपट येणार का? अशी सिनेरसिकांमध्ये चर्चा होत आहे. 'पंचायत' वेबसीरीजमध्ये 'प्रधान जी'ची भूमिका साकारणाऱ्या रघुबीर यादव यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. अलीकडेच रघुबीर यादव यांनी 'पंचायत' सीरिजवर चित्रपट होणार की नाही? या प्रश्नाचं उत्तर 'व्हरायटी इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिलं आहे. त्यांनी दिलेल्या उत्तराने अनेक चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.



'पंचायत' वेबसीरीजचे रूपांतर चित्रपटामध्ये करण्याच्या चर्चांबद्दल 'व्हरायटी इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रघुबीर यादव म्हणाले की, "वेबसीरीजचं रुपांतर चित्रपटामध्ये होईल की नाही? या बद्दल मी केव्हा विचारही केला नाही. वेबसीरीजचं चित्रपटामध्ये रूपांतर करावं की नाही, हे लेखकांवर अवलंबून आहे. जर 'पंचायत'वर चित्रपट बनला, तर मी त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. तो बनावा किंवा नाही बनावा याबद्दल मी कोणताही विचार करू शकत नाही. तो त्यांचा विचार आहे. जर चित्रपट बनला, तर मी नक्कीच त्यात काम करेन." 'पंचायत' सीरीज किंवा चित्रपटाच्या रूपात सादर केला तर, गावकऱ्यांची कथा अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होऊ शकते. असे असले तरी, यादव यांच्या मते, हे स्वरूप सीरीजच्या कथाकथनासाठी एक आव्हान ठरू शकते. ते म्हणाले, "गावातल्या लोकांच्या आयुष्यातली गंमत तीन तासात कशी दाखवणार? लेखकाच्या मनात कदाचित आणखी सीझन असतील. मग चित्रपट बनवून ते हा सीझन का खराब करतील?"



मुलाखतीमध्ये रघुबीर यादव यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले. ते म्हणाले की, " 'पंचायत'चे कथानक तीन तासांत दाखवणं अवघड आहे. फुलेरातील गावकऱ्यांचे आयुष्य एवढ्या कमी वेळात दाखवणं अशक्य आहे, मी त्यांच्यासोबत राहिलो आहे. बनराकस, मंजू देवी किंवा सचिवजी यांसारख्या कॅरेक्टरचं आयुष्य तीन तासांमध्ये दाखवणं अशक्य आहे. त्यांच्यासाठी ते खूप कमी आहे. एखाद्याचं आयुष्य तीन- चार तासामध्ये मांडणं खूप कठीण आहे." खरंतर, 'पंचायत' सीरीज केवळ एका मुख्य भूमिकेपुरती नाही, ही मल्टीस्टारर वेबसीरीज आहे. मंजू देवी, बनारकस, प्रधानपती ब्रिज भूषण आणि सचिवजी ही कॅरेक्ट संपूर्ण वेबसीरीजमध्ये स्वतःच्या वेगळ्या कथा आणि नातेसंबंध विकसित करताना आपल्या पाहायला मिळत आहे. ह्या संपूर्ण सीरीजचं कथानकच खूप मोठं आहे. गावकऱ्यांच्या आयुष्याचा पसारा फक्त तीन- चार तासामध्ये दाखवणं अशक्य असल्याची प्रतिक्रियाही रघुबीर यादव यांनी दिली आहे.



दरम्यान, चाहते 'पंचायत'च्या पाचव्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. जून 2025 मध्ये पंचायतचा चौथा सीझन रिलीज झाला होता. त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये या वेबसीरीजच्या पुढच्या सीझनची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. द व्हायरल फीवर (TVF)निर्मित ही सीरीज येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये रिलीज करण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

Siddharth Jadhav New Movie : ‘हुप्पा हुय्या’नंतर सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा दिसणार हनुमान भक्ताच्या भूमिकेत; ‘बजरंगी’ चित्रपटाचा फर्स्ट लुक चर्चेत

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा हनुमान भक्ताच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या

Love And War : 'नजर मिलेंगी, लेकिन हटेंगी नहीं'... रणबीर आणि आलियानंतर आता विकी कौशलचा फर्स्ट लूक समोर; रफ अँड टफ अंदाजाची चर्चा

Love And War : संजय लीला भन्साळी यांच्या बहुप्रतिक्षित ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. रणबीर

Sunita Ahuja : गोविंदा अन् सुनीता आहुजा यांच्यात पुन्हा वादाची चर्चा, काली मातेच्या दर्शनानंतर सुनीता भावुक

Sunita Ahuja : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक नात्याबाबत गेल्या काही काळापासून विविध चर्चा

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या भावाला 3 हजारांची लाच घेताना अटक; ACB ची हिसारमध्ये कारवाई

बॉलिवूड अभिनेता आणि फिल्म निर्माता यशपाल शर्मा यांचा सख्खा भाऊ राजेश कुमार याला तीन हजार रुपयांची लाच

Yami Gautam : यामी गौतमच्या ‘नयी नवेली’ चित्रपटातील ‘भाभी तबाही’ गाणे रिलीज, वहिनी आहे की डायन?

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम धर हिची मुख्य भूमिका असलेल्या 'नयी नवेली' या आगामी फँटसी फॅमिली एंटरटेनर

संजय लीला भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर'मधील आलिया भट्टचा रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल!

मुंबई: