ST Bus NCMC Card : ज्येष्ठ नागरिक-महिलांसाठी महत्त्वाची बातमी ! १ ऑक्टोबरपासून ST बसच्या सवलतीसाठी NCMC कार्ड अनिवार्य

ST Bus NCMC Card : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून NCMC कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. सवलतीचे तिकीट देताना NCMC कार्डचा वापर करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी राज्यभरातील एसटी आगार आणि बसस्थानकांवर NCMC कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.



सवलतीचे तिकीट NCMC कार्डद्वारेच


एसटी महामंडळाकडून शासनाच्या निर्देशानुसार विविध सामाजिक घटकांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा दिली जाते. यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना मिळणाऱ्या सवलतींचा समावेश आहे. या सवलतीच्या प्रवासाचे अधिक सुलभ आणि डिजिटल व्यवस्थापन करण्यासाठी NCMC कार्ड प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. १ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट NCMC कार्डमधूनच वितरित केले जाणार आहे. त्यामुळे सवलतीचा लाभ घेणाऱ्या पात्र प्रवाशांनी १ ऑक्टोबरपूर्वी NCMC कार्डची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.



कार्ड नसले तरी QR कोड पावतीने मिळणार सवलत


ज्या प्रवाशांकडे कार्यरत Active NCMC कार्ड आहे किंवा NCMC कार्ड नोंदणी केल्याची QR कोड असलेली पावती आहे, त्यांना सवलतीचा लाभ मिळणार आहे. NCMC कार्डची नोंदणी केल्यानंतर मिळालेली QR कोडयुक्त पावती वाहकाच्या ETM मशीनवर स्कॅन करून सवलतीचे तिकीट घेता येणार आहे. ही नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार आहे. या कालावधीत प्रवाशांनी NCMC कार्ड Active करून त्यामध्ये Top-up करणे आवश्यक आहे.



अधिकृत केंद्रांवर NCMC कार्डची नोंदणी


NCMC कार्ड नोंदणी आणि वितरणासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांची एसटी बसस्थानक, आगार तसेच आगाराच्या हद्दीबाहेरील अधिकृत एजंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना जवळच्या अधिकृत केंद्रावर NCMC कार्ड नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.NCMC कार्डमध्ये रक्कम भरण्यासाठी BHIM Appद्वारे Top-up करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्डच्या मागील बाजूस असलेला QR कोड BHIM Appच्या माध्यमातून स्कॅन करून कार्डमध्ये रक्कम भरता येणार आहे.



१ ऑक्टोबरपूर्वी कार्ड नोंदणी करण्याचे आवाहन


आधार कार्डवरील बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे न उमटल्यामुळे नोंदणी करताना अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांसाठीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. आधार कार्डशी संलग्न मोबाइल क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या OTPच्या आधारे NCMC कार्ड नोंदणी करण्याची कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे. सवलतीचा प्रवास अधिक पारदर्शक, डिजिटल आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने NCMC कार्ड प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी १ ऑक्टोबर २०२६ पूर्वी NCMC कार्डची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

Comments
Add Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दुष्काळग्रस्तांसाठी मोठी घोषणा, मुलींच्या लग्नाचा संपूर्ण खर्च आणि शिक्षणाची हमी

मुंबई: दिवाळीचा सण संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होत असताना, दुसरीकडे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या

'धीर सोडू नका, टोकाचा निर्णय घेऊ नको... शिवसेना तुमच्या पाठीशी' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांना ग्वाही

दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्याला पाठीशी उभं राहून धीर देण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे

गोकुळच्या शासननियुक्त संचालकांच्या मतदानाचा अधिकार कायम; अध्यक्षपदासाठी आज निवडणूक

मुंबई: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग तूर्तास मोकळा झाला

Mumbai Pune Expressway : अटल सेतू ते मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग जोडमार्गाचे 67 टक्के काम पूर्ण; प्रवासात 90 मिनिटांपर्यंत बचतीची अपेक्षा

Mumbai News: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जोडमार्ग

महाराष्ट्रात लिफ्ट सुरक्षेचे नियम कडक; CCTV, विमा आणि मासिक देखभाल अनिवार्य, जाणून घ्या नवे नियम

राज्य सरकारने निवासी, व्यावसायिक आणि सार्वजनिक इमारतींमधील लिफ्ट, एस्केलेटर आणि मूव्हिंग वॉकवेसाठी सुरक्षा

दिवाळीत मच्छीमारांच्या भेटीला जाणार मंत्री नितेश राणे, वर्सोव्यात साधणार संवाद

राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच नाही, तर किनारपट्टीवरील मच्छीमार