मुंबई: चारधाम यात्रेकरूंच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. खराब हवामानामुळे चार धाम यात्रा दोन दिवसांकरिता स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उत्तराखंडमध्ये हवामान विभागाने दिलेल्या रेड आणि ऑरेंज अलर्टमुळे चारधाम यात्रा व्यवस्थापन आणि नियंत्रण संस्थानाकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने दिलेला रेड आणि ऑरेंज अलर्ट लक्षात घेता, आज आणि उद्या (शनिवार- रविवार) असे दोन दिवस यात्रा स्थगित केल्याची माहिती समोर आली आहे. हवामान विभागाकडून उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांना काही आवश्यक काम असल्यास घराबाहेर पडण्याचे आदेशही देण्यात आले आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात 14 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची भक्तिमय वातावरणात ...
गढवालचे आयुक्त आनंद स्वरूप यांनी या संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र जारी केले आहे. चारधामच्या ठिकाणाच्या व्यवस्थेवर सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारीदेखील बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आयुक्तांनी जारी केलेल्या पत्रामध्ये, हवामान खात्याने दिलेला अंदाज आणि भाविकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर, रेड अलर्टमुळे चार धाम यात्रा शनिवार दुपारपासून रविवारपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये खबरदारीचे उपाय देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवामान अनुकूल झाल्यावरच यात्रा पुन्हा सुरू होईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. हवामान विभागाने 26 आणि 27 सप्टेंबर रोजी उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा 'रेड' आणि 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे. काही जिल्ह्यांसाठी 'यलो' अलर्टही जारी करण्यात आला आहे.
मुंबई : आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवाच्या काळात रेल्वे प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने तब्बल 418 विशेष गाड्या चालवण्याची ...
मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे शनिवारी बागेश्वर, पिथौरगड, चंपावत, नैनिताल आणि उधम सिंग नगर या पाच जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. डेहराडून, पौडी, रुद्रप्रयाग, चमोली आणि अल्मोडा या इतर पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, हरिद्वार, उत्तरकाशी आणि टिहरीसाठी यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. रविवारसाठी, हवामान विभागाने डेहराडून, टिहरी, पौरी आणि हरिद्वार या चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, तर उत्तरकाशी, चमोली, नैनिताल आणि रुद्रप्रयागसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, बागेश्वर, अल्मोडा, चंपावत, उधम सिंग नगर आणि पिथौरगडसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने 26 आणि 27 सप्टेंबरसाठी पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी अधिकाऱ्यांना 24 तास सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून पर्यटकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.