गुवाहाटी : गुवाहाटी विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या 22 वर्षीय निमिषा ठाकुरिया हिचा गुवाहाटीतील अझारा परिसरातील एका होमस्टेमध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिच्यासोबत असलेल्या असिफ अली याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिच्या मृत्यूची परिस्थिती आणि कारणाचा तपास सुरू आहे. (Guwahati News)
मिळालेल्या माहितीनुसार, निमिषा गारचुक-धारापूर परिसरातील Rudra’s Kitchen या होमस्टेमध्ये गेली होती. शनिवारी सकाळी ती तेथे बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातील एका लॉजमध्ये 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. ...
या प्रकरणात ताब्यात असलेल्या असिफ अलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, निमिषाने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा केला आहे. मात्र, पोलिसांनी हा दावा अद्याप सत्य म्हणून स्वीकारलेला नाही. घटनेशी संबंधित सर्व शक्यता तपासण्यात येत असून, शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट केले जाणार आहे. (Guwahati News)
पोलिस निमिषाच्या हालचाली, होमस्टेमधील घटनाक्रम आणि असिफ अलीची भूमिका यांची चौकशी करत आहेत. होमस्टेतील नोंदी आणि संबंधित व्यक्तींचीही माहिती तपासली जात आहे. (Guwahati News)
मुंबई : मुंबई महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) देशभरात सुरू असलेल्या मोठ्या सोने तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गेल्या 9 महिन्यांत कुरिअर नेटवर्कच्या ...
दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक पातळीवर तणाव निर्माण झाला असून, नागरिकांनी रस्त्यावर आंदोलन केल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, निमिषाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही आणि पोलिसांचा तपास सुरू आहे. (Guwahati News)






