मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, "विरोधी पक्षांची मानसिकता अति डावी, त्यांचा मेंदूच चोरीला गेलाय"

मुंबई : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधकांकडून सातत्याने उपस्थित केले जात असलेल्या ईव्हीएम (EVM) आणि निवडणूक प्रक्रियेवरील प्रश्नांवरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार निशाणा साधला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेचा दाखला देत, विरोधकांचा फेक नरेटिव्ह पूर्णपणे उध्वस्त झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.(Fadnavis Rahul Gandhi)



निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेने नरेटिव्ह उध्वस्त


राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, "जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकता तेव्हा निवडणूक आयोग चांगला असतो, मात्र भाजप जिंकला तर निवडणूक आयोग खराब कसा होतो? निवडणूक आयोगाच्या तिन्ही आयुक्तांनी काल जी पत्रकार परिषद घेतली, त्यामुळे राहुल गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांचा फेक नरेटिव्ह पूर्णपणे उध्वस्त झाला आहे." देशात 'मत चोरी' झाल्याचा विरोधकांचा दावा फेटाळून लावत फडणवीस म्हणाले, "हे देशात मत चोरी झाल्याचे म्हणत आहेत, मात्र यांचा मेंदूच चोरीला गेलेला आहे. त्यांची मानसिकता अति डावी झाली असून त्यांना अति डावी राजवट आणायची आहे. संविधान दाखवणाऱ्यांना लोकशाही मान्य नाही."



निवडणुकीत हारले की आयोगावर खापर


विरोधक निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर नेहमीच निवडणूक आयोगावर खापर फोडतात, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. ते म्हणाले, "ईव्हीएम संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. तसेच निवडणूक आयोगाने 'ईव्हीएम हॅक करून दाखवा', असे आव्हान देऊन १५ दिवसांचा कालावधी दिला होता, मात्र तेव्हा कोणीही पुढे आले नाही. आता विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण करायला हवे."


?feature=share

'पंतप्रधानांनी मेंदूवर उपचारासाठी उपाययोजना करावी' - मुख्यमंत्र्यांचा उपरोधिक टोला


पश्चिम बंगालमधील निवडणुकीचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना घेरले. "पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे उमेदवार निवडून येतात, मग एसआयआर (SIR) वर पराभवाचे खापर कसे फोडता?" असा सवाल त्यांनी केला. तसेच, "विरोधी पक्ष मत चोरी झाल्याचा कांगावा करतात, पण प्रत्यक्षात त्यांचा मेंदूच चोरीला गेला आहे. आता पंतप्रधानांनी यांच्या मेंदूवर उपचारासाठी उपाययोजना करावी," असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. संविधानावरून विश्वास उडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत, कितीही प्रयत्न केला तरी देशात साम्यवादी राजवट आणता येणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.(Fadnavis Rahul Gandhi)

Comments
Add Comment

Goregaon Mulund Link Road केव्हापासून मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होणार? समोर आली तारीख...

मुंबई: गोरेगाव आणि मुलुंडवाकरांसाठी आनंदाची बातमी म्हणता येईल. गोरेगाव - मुलुंड लिंक रोड (GMLR)प्रकल्पाचा गोरेगाव

विंडीज ओपनर्सचा भारतीय भूमीवर 22 वर्षांनंतर मोठा धमाका; कॅम्पबेल आणि ग्रीव्ह्सने रचला इतिहास!

भारत वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना

Maharashtra Government : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी सरकारचा मोठा निर्णय! 265 तालुक्यांत मदत, उर्वरित तालुक्यांचीही पाहणी

नागपूर : अपुऱ्या पावसामुळे महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या तालुक्यांमध्ये

E Commerce News : ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, जिओमार्ट अडचणीत! नोंदणी नसलेल्या कृषी रसायनाच्या विक्रीप्रकरणी ₹25 लाखांचा दंड

मुंबई : ऑनलाइन खरेदीदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA)

Pune News: "वय केवळ आकडा..." पुण्यामध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत आजींचा भन्नाट डान्स; पाहा Video

पुणे: नुकतंच आपण सर्वांनी गणरायाला जड अंत:करणाने भावपूर्ण निरोप दिला. अनेक ठिकाणी गणरायाच्या विसर्जनासाठी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात कोणत्या गोष्टी टाळाव्यात, पंधरवड्यात काय काळजी घ्यावी? जाणून घ्या

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष हा आपल्या पितरांसाठी समर्पित आहे. या 15 दिवसांच्या कालावधीत आल्या प्रियजनांच्या