समरकंद (उझबेकिस्तान): उझबेकिस्तानमधील समरकंद येथे पार पडलेल्या 46 व्या चेस ऑलिम्पियाड 2026 (Chess Olympiad 2026) मध्ये भारतीय बुद्धीबळ संघाने जबरदस्त कामगिरी करत जागतिक पातळीवर भारताचा झेंडा रोवला आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत दोन्ही भारतीय संघांनी पदकांची कमाई केली असून, 'ओपन' गटात भारताने रौप्य पदक तर महिलांच्या गटात कांस्य पदकावर आपली मोहोर उमटवली आहे.
नवी दिल्ली: वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या वन डे सामन्यामध्ये भारताने 300 रनमध्ये 8 विकेटमध्ये सामना जिंकला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुबमन ...
ओपन गटात भारताचे उत्कृष्ट रौप्य पदक
'ओपन' गटाच्या अंतिम फेरीत भारताचा सामना हंगेरीविरुद्ध झाला, जो अटीतटीत 2-2 अशा बरोबरीत सुटला. या सामन्यात जागतिक विजेत्या गुकेश डोम्माराजूला हंगेरीच्या ग्रँडमास्टर ग्लेब डुडिनकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, ग्रँडमास्टर अर्जुन एरिगासीने ग्रँडमास्टर पीटर लेकोचा पराभव करत शानदार पुनरागमन केले आणि भारताचा सामना बरोबरीत सोडवून रौप्य पदक निश्चित केले.
यजमान उझबेकिस्तानने अंतिम फेरीत युक्रेनचा 2.5- 1.5 असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. उझबेकिस्तान संघ भारत आणि जर्मनीपेक्षा दोन गुणांनी आघाडीवर राहिला, तर 'टाय-ब्रेक'च्या आधारे भारताने दुसरे स्थान मिळवत रौप्य पदकाला गवसणी घातली. या गटात जर्मनीने नेदरलँड्सचा पराभव करून कांस्य पदक पटकावले.
नवी दिल्ली: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मधील पुरुष क्रिकेट प्रकारात भारताचा सामना आता उपांत्यपूर्व फेरीत अफगाणिस्तानशी होणार आहे. जपानमधील ...
महिला संघाने जिंकले कांस्य पदक
दुसरीकडे, महिलांच्या गटातही भारताच्या खेळाडूंनी जिद्द दाखवली. जॉर्जियाविरुद्धचा अंतिम फेरीचा रोमांचक सामना 2-2 असा बरोबरीत सुटल्यामुळे भारताच्या महिला संघाने कांस्य पदक आपल्या नावावर केले. कठीण परिस्थितीत जॉर्जियाच्या इंटरनॅशनल मास्टर मेरी अराबिद्झेविरुद्ध सामना बरोबरीत सोडवून भारताच्या इंटरनॅशनल मास्टर सविता श्री हिने निर्णायक भूमिका बजावली.
महिलांच्या विभागात चीनने व्हिएतनामचा 3-1 असा पराभव करत आपले सातवे सुवर्णपदक जिंकले, तर कझाकस्तानने रौप्य पदक पटकावले. टाय-ब्रेकच्या जोरावर अमेरिका, पोलंड आणि आर्मेनियासारख्या बलाढ्य संघांना मागे टाकत भारतीय महिलांनी कांस्य पदकावर आपले नाव कोरले. भारतीय बुद्धीबळपटूंच्या या ऐतिहासिक यशाबद्दल देशभरातून त्यांच्यावर अभिनवनाचा वर्षाव होत आहे.