मुंबई: गणेशोत्सवानंतर राज्यातील हवामानात पुन्हा मोठे फेरबदल जाणवणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये पावसाचं वातावरण कसं असेल? आणि मान्सून परतीच्या वाटेवर असताना राज्यामध्ये पावसाचं चित्र कसं राहील? याबद्दलची माहिती जाणून घेऊया... आज रविवारी हवामान खात्याने 16 जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. त्याप्रमाणे हवामान खात्याने या भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्याना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आपल्या कामाचे नियोजन करण्याची माहिती दिली होती. उद्या देखील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार आहे, जाणून घेऊया...
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ऑगस्ट 2026 महिन्याचा ₹1,500 चा हप्ता रखडल्यामुळे लाभार्थी ...
राज्यामध्ये सोमवारी हवामान बदलाची शक्यता आहे. हवामान विभागाने घाट परिसरामध्ये अर्थात पुणे घाट, कोल्हापूर घाट, सातारा घाट, सांगली, बीड आणि उस्मानाबाद या सहा जिल्ह्यांमध्ये यलो अलर्टचा अंदाज वर्तवला आहे. तर उर्वरित 15 जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मध्यम आणि हलका स्वरूपाचा पाऊस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक घाट, छत्रपती संभाजीनगरसह इतरत्र 8 जिल्ह्यांमध्ये पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. या 15 जिल्ह्यांमध्ये हा पाऊस सलग पडणार असून नागरिकांना अधून मधून पावसाच्या सरी अनुभवायला मिळणार आहे. कोकण किनारपट्टीवरील नागरिकांना वातावरण पाहूनच घराबाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले आहे.
नागपूर : अपुऱ्या पावसामुळे महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या तालुक्यांमध्ये दुष्काळ व्यवस्थापनाच्या पहिल्या ...
कोकण किनारपट्टीतील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात ढगाळ वातावरणासह पाऊस बरसणार असल्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीतील काही परिसरामध्ये पावसाच्या सरी अधूनमधून कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना स्थानिक हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर या भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात पावसाची तीव्रता तुलनेने अधिक राहण्याची शक्यता असल्याने येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. या परिसरातील नागरिकांनाही काहीसा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधकांकडून सातत्याने उपस्थित केले जात असलेल्या ईव्हीएम (EVM) आणि निवडणूक प्रक्रियेवरील प्रश्नांवरून ...
कोल्हापूर घाट, सांगली, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या परिसरामध्ये पावसाच्या सरींसह काही ठिकाणी वातावरणात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. घाट परिसरातील शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानानुसार पिकांची खबरदारी घेणे गरजेचं आहे. राज्यातील काही मोजक्या जिल्ह्यांतील वातावरण कोरडं राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे त्या जिल्ह्यांना पाऊसामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाने नागरिकांना वेळोवेळी आपल्या जिल्ह्यातील हवामानविषयीची अपडेट घेण्याची माहिती दिली आहे. त्या अंदाजाने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.