Man Ki Baat : पंतप्रधानांच्या 'मन की बात'मध्ये महाराष्ट्राच्या अष्टविनायक परंपरेचा गौरव; थायलंडच्या नागरिकाने उभारले भव्य गणेश संग्रहालय!

नवी दिल्ली : भारताची सांस्कृतिक परंपरा आणि गणेशोत्सवाचा गोडवा आता केवळ देशातच नव्हे, तर सातसमुद्रापार पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच घेतलेल्या लोकप्रिय 'मन की बात' या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या अष्टविनायक परंपरेचा विशेष गौरव केला आहे. थायलंडमधील एका गणेशभक्ताच्या अगाध भक्तीचा आणि त्यांच्या प्रेरणेतून थायलंडमध्ये लोकप्रिय झालेल्या अष्टविनायक यात्रेचा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी आवर्जून केला.(Man Ki Baat)



थायलंडमध्ये लोकप्रिय होत आहे अष्टविनायक यात्रा


पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये थायलंडच्या पंथौन थीरखानोन यांच्या प्रेरणादायी प्रवासाची आठवण सांगितली. ते म्हणाले की, थायलंडमध्ये भगवान गणेश यांची 'फ्रा फिकानेत' या रूपाने पूजा केली जाते.  पंथौन थीरखानोन यांना वयाच्या 19 व्या वर्षी त्यांच्या वडिलांनी गणपतीची एक फोटो भेट दिली होती, जिथून त्यांच्या अध्यात्मिक प्रवासाची सुरुवात झाली. गणेश परंपरांच्या अध्ययनात चार दशकांहून अधिक काळ घालवणाऱ्या पंथौन यांचे महाराष्ट्राशी विशेष नाते आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायक परंपरेची माहिती मिळाल्यानंतर ते अनेकदा महाराष्ट्रात आले आणि त्यांच्याच प्रयत्नांमुळे आता थायलंडमधील भाविकांमध्येही अष्टविनायक यात्रा अत्यंत लोकप्रिय झाली आहे.(Thailand Ganesh Museum)





10 हजारांहून अधिक गणेश प्रतिमा असलेले 'गणेश हिमाल म्यूजियम'


थायलंडच्या या गणेशभक्ताने भारताबाहेरही गणपतीची संस्कृती जोपासली आहे. वर्ष 2002 मध्ये त्यांनी उत्तर थायलंडमधील चियांग माई येथे 'गणेश हिमाल म्यूजियम' ची स्थापना केली. या संग्रहालयात आज 10 हजारांपेक्षा अधिक गणेश प्रतिमा पाहायला मिळतात. विशेष म्हणजे, ज्या भाविकांना भारतामध्ये प्रत्यक्ष अष्टविनायकाच्या दर्शनाला येणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी या संग्रहालयात अष्टविनायकाच्या विशेष प्रतिमा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या संग्रहालयात दर रविवारी सकाळी 10 वाजता गणेश पूजा-अर्चना केली जाते, तसेच गणेशोत्सवासारख्या विशेष प्रसंगी विविध धार्मिक अनुष्ठानांचे आयोजनही केले जाते. पंतप्रधानांनी या अनोख्या उदाहरणातून हे अधोरेखित केले की, भारताची आस्था, कला आणि सांस्कृतिक परंपरा कशा प्रकारे जगभरात पोहोचत आहेत आणि इतर देशांमधील नागरिकांनाही भुरळ घालत आहेत. या संवादाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या अष्टविनायक परंपरेचा जागतिक पातळीवर झालेला गौरव प्रत्येक मराठी मनाचा अभिमान वाढवणारा ठरला आहे.

Comments
Add Comment

30 दिवसांचे प्लॅन्स अन् व्हॉईस-एसएमएसचे पर्याय दाखल; खासदार राघव चड्ढांची प्रीपेड युजर्ससाठी मोठी घोषणा! काय बदल झाले आहेत ते जाणून घ्या

नवी दिल्ली : देशातील करोडो मोबाईल प्रीपेड युजर्ससाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. खासदार

Free Aadhaar Card Update : मुलांचे आधार कार्ड अपडेट केले का? 30 सप्टेंबरपर्यंत मिळणार मोठी सवलत; नाहीतर...

आधार कार्ड हे  भारतातील महत्त्वाचे ओळखपत्र असून अनेक सरकारी आणि शैक्षणिक कामांसाठी त्याचा वापर केला जातो.

Bengaluru AI camera : शेवटी AI चुकलंच! गिटारला हेल्मेटविना सहप्रवासी समजून ठोठावला ₹500 चा दंड; नेमकं प्रकरण काय?

बंगळुरू : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने वाहतूक नियमभंगावर नजर ठेवणाऱ्या कॅमेऱ्याने चक्क गिटारला व्यक्ती

Kanyakumari Theft : एका रीलने खेळ खल्लास! YouTuber दाम्पत्याची 'ती' चूक अन् चोरट्यांनी मारला घरात डल्ला; पोलिसही चक्रावले

तामिळनाडू : सोशल मीडियावर आपली जीवनशैली आणि घरातील गोष्टी शेअर करणे आता अनेकांसाठी रोजच्या आयुष्याचा भाग बनला

Chardham Yatra News: भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! चारधाम यात्रा दोन दिवसांसाठी बंद; उत्तराखंडमध्ये अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई: चारधाम यात्रेकरूंच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. खराब हवामानामुळे चार धाम यात्रा दोन दिवसांकरिता

Maharashtra Sadan Delhi : दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाची दिमाखात सांगता; भव्य मिरवणुकीने गणरायाला निरोप

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात 14 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या सार्वजनिक