US Iran Conflict : अमेरिकेच्या हल्ल्यातून बचावले नवे सर्वोच्च नेते; मोजतबा खामेनेईंबाबत इराणी नेत्याचा खळबळजनक दावा

अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यांदरम्यान मोहतबा खामेनेई उपचार घेत असलेल्या रुग्णालयावरही हल्ला झाला. या हल्ल्यानंतर त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आल्याचे हैदरी यांनी सांगितले.

तेहरान : अमेरिका आणि इस्रायलच्या भीषण हल्ल्यांदरम्यान इराणच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून निवड झालेले अयातुल्ला मोजतबा खामेनेई हे अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयाच्या ढिगाऱ्याखालून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचा दावा इराणी नेते मोहसेन हैदरी यांनी कतारच्या वृत्तवाहिन्याला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. या भीषण हल्ल्यांमध्ये तेहरानमधील तब्बल तीन रुग्णालयांना लक्ष्य करण्यात आले होते. तिसऱ्या रुग्णालयात उपचार घेत असताना मोजतबा खामेनेई यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. अमेरिकेच्या गुप्तचर अहवालानुसार, या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली असून, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत जगभरात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.(US Iran Conflict)






विशेष म्हणजे, 8 मार्च रोजी गुप्त पद्धतीने पार पडलेल्या प्रक्रियेत त्यांची नव्या सर्वोच्च नेतेपदी निवड झाली. खुद्द मोजतबा खामेनेई यांनाही सरकारी टीव्हीवर घोषणा होईपर्यंत या निवडीची कल्पना नव्हती, असा गौप्यस्फोट हैदरी यांनी केला आहे. हा निवड सोहळा पार पडणाऱ्या ‘असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स’च्या कोम येथील सचिवालयावरही बॉम्बहल्ला झाला होता, ज्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आणि महत्त्वाची कागदपत्रे नष्ट झाली. मोजतबा खामेनेई यांच्याकडे याआधी कोणतेही औपचारिक राजकीय पद नव्हते, ते केवळ वडिलांचे मुख्य सल्लागार होते. त्यामुळे अनेकदा त्यांना ‘अंधारातील व्यक्ती’ म्हणून संबोधले जाते. मात्र, देशासमोरील युद्धजन्य परिस्थिती पाहता त्यांच्याशिवाय दुसरा सक्षम पर्याय नाही, असे समर्थन हैदरी यांनी केले आहे. सध्या मोजतबा खामेनेई यांची प्रकृती उत्तम असून त्यांच्याकडे देश चालवण्याची पूर्ण क्षमता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.(US Iran Conflict)

Comments
Add Comment

एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेसकडून सौदी अरेबियाच्या उड्डाणांवरील निर्बंध वाढवले; रियाध-दम्माम सेवा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद

मुंबई : मध्यपूर्वेतील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन टाटा समूहाच्या एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या विमान

Gilgit Baltistan Van Accident : पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवाशांची व्हॅन नदीत कोसळली; भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू

इस्लामाबाद: पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून (PoK) एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि मोठी दुर्घटना समोर आली आहे.

Microsoft 365 ची सेवा पुन्हा रुळावर! Outlook सेवा पूर्ववत; जगभरातील युजर्सना मोठा दिलासा!

मुंबई: नोकरदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या 18 तासांपासून बंद असलेलं मायक्रोसॉफ्ट आऊटलूक (Microsoft Outlook)ची सेवा

एनवीडियाच्या सीईओचा राजीनामा; नेमकं कारण काय?

मुंबई: जागतिक पातळीवर खळबळ उडवून देणार्‍या एका मोठ्या बातमीमुळे, दिग्गज टेक कंपनी एनवीडियाचे (Nvidia) मुख्य

Nvidia मध्ये मोठी उलथापालथ; गंभीर वादानंतर जेनसन हुआंग यांनी सोडले सीईओ पद

एनविडियाचे सहसंस्थापक जेनसन हुआंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीचे अध्यक्ष, सीईओ आणि संचालक मंडळ

ॲपलनंतर आता एनव्हिडियाची धुरा सांभाळणार टिम कुक? जेन्सन हुआंग यांच्या जागी नावाची जोरदार चर्चा!

जगातील सर्वात मोठी कंपनी असलेली एनव्हिडीया कंपनीचे सीईओ सध्या जोरदार चर्चेत आहेत. कथित विवाहबाह्य संबंधांमुळे