Matang Samaj : मातंग समाज मुंबईत धडकणार! उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी 29 सप्टेंबरला महामोर्चा

मुंबई : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी मातंग समाजाकडून 29 सप्टेंबर रोजी मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यभरातून सुमारे 5 लाख समाजबांधव मुंबईत दाखल होणार असल्याचा दावा आंदोलनाच्या आयोजकांनी केला आहे. आझाद मैदानावर हा मोर्चा होणार असून, शासन निर्णय जारी होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Matang Samaj)


अनुसूचित जातींच्या 13 टक्के आरक्षणाचे अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याची मागणी मातंग समाजाकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी उपवर्गीकरणाला घटनात्मक मान्यता देण्याचा मार्ग मोकळा केला होता. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने या विषयाचा अभ्यास करण्यासाठी न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीने 16 मार्च 2026 रोजी अहवाल सरकारकडे सादर केला. (Matang Samaj)



मात्र, अहवालावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध भागांत आंदोलनं आणि मोर्चे काढण्यात आले असून, 29 सप्टेंबरच्या मुंबईतील मोर्चातून सरकारवर निर्णयासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जूनमध्येही सकल मातंग समाजाच्या बैठकीत सरकारने निर्णय न घेतल्यास 29 सप्टेंबरला महामोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. (Matang Samaj)


राज्यात मोठ्या प्रमाणावर सरकारी नोकरभरती होण्याची शक्यता असल्याने त्याआधी उपवर्गीकरण लागू करावे, अशी आंदोलकांची मागणी आहे. यामुळे आरक्षणातील लाभ अधिक वंचित घटकांपर्यंत पोहोचतील, असा त्यांचा दावा आहे. नाशिकसह विविध जिल्ह्यांतही अलीकडे या मागणीसाठी मोर्चे काढण्यात आले आहेत. (Matang Samaj)



या आंदोलनासाठी विविध मातंग नेते आणि सामाजिक संघटना एकत्र आल्या आहेत. आझाद मैदानावर मोठ्या संख्येने आंदोलक येणार असल्याने त्यांच्या वाहतूक, पाणी, वैद्यकीय सेवा आणि इतर मूलभूत सुविधांसाठी संबंधित प्रशासनाकडे व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Matang Samaj)


Comments
Add Comment

‘शेतकरी एकटा नाही’… देवाभाऊंचा शेतकऱ्यांना आधार; आमदार चित्रा वाघ काय म्हणाल्या ?

मुंबई : शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून निर्णय घेणं, हीच खरी संवेदनशीलता असल्याचे प्रतिपादन करत भाजपाच्या

Mumbai News : राम मंदिर परिसरातील सार्वजनिक शौचालयात रासायनिक वायू गळती, 2 तरुणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात रासायनिक वायूसारखा वास पसरल्याने दोन जणांचा मृत्यू

BMC Health Department : केईएम, शीव रुग्णालयातील एंडोस्कोपिक मशीन्सची खरेदी बाळगळली

तीन वर्षांपूर्वी खरेदीला दिलेल्या मंजुरीचा प्रस्ताव आता रद्द करायला निघाले प्रशासन मुंबई (सचिन धानजी) : मुंबई

Dengue Cases Mumbai : डेंग्यू, मलेरियाच्या आजारांत वाढ, महापालिकेच्यावतीने धुम्रफवारणीकरता टॅमिफॉस आणि ऍल्युमिनियम फॉस्फाईड

तब्बल दहा महिन्यांपासून निविदेत अडकली होती औषध खरेदी मुंबई (सचिन धानजी) मुंबईत सध्या साथीच्या आजारांच्या

Mumbai Ganeshotsav 2026 : मुंबईत यंदा तब्बल साडे नऊ हजारांहून बाप्पा झाले कमी

सार्वजनिक ५२ मंडळांचे गणपती वाढले, पण घरगुती गणपतींची संख्या घटली मुंबई (सचिन धानजी) : मुंबईत गणरायांचे आगमन

Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन वाहनांचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू, एक गंभीर

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाट परिसरात शनिवारी दुपारी तीन वाहनांचा अपघात झाला. दोन आयशर टेम्पो आणि