Monday, September 28, 2026

WhatsApp Safety : 'व्हॉट्सॲप' अकाउंट बॅन होऊ नये यासाठी 4 गोष्टी टाळा; छोट्या चुकाही पडू शकतात महागात

WhatsApp Safety : 'व्हॉट्सॲप' अकाउंट बॅन होऊ नये यासाठी 4 गोष्टी टाळा; छोट्या चुकाही पडू शकतात महागात

मुंबई : WhatsApp आजच्या काळात संवादाचे महत्त्वाचे माध्यम बनले आहे. त्यामुळे अचानक WhatsApp Account Ban झाल्यास मोठी अडचण निर्माण होऊ शकते. विशेष म्हणजे, अकाउंटवर कारवाई होण्यासाठी नेहमीच एखादी मोठी चूक असणे आवश्यक नाही. काही सामान्य वाटणाऱ्या गोष्टीही WhatsAppच्या नियमांचे उल्लंघन ठरू शकतात. (WhatsApp Safety)

WhatsAppच्या माहितीनुसार, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अकाउंट्सची ओळख तंत्रज्ञान आणि यूजर्सकडून मिळणाऱ्या रिपोर्ट्सच्या आधारे केली जाते. त्यामुळे WhatsApp वापरताना काही गोष्टी टाळणे महत्त्वाचे आहे.

1. वारंवार अनावश्यक मेसेज पाठवू नका

एखाद्या व्यक्तीने आपल्याला मेसेज करू नका, असे स्पष्टपणे सांगितले असेल तर त्यानंतर पुन्हा मेसेज करणे टाळावे. सतत नको असलेले मेसेज पाठवल्यास संबंधित व्यक्ती तुमच्याविरोधात रिपोर्ट करू शकते. अशा परिस्थितीत त्या कॉन्टॅक्टशी पुढील संपर्क टाळण्याचा सल्ला WhatsApp देते.(WhatsApp Safety)

2. Bulk आणि Automatic Messagingपासून दूर राहा

एकाच वेळी मोठ्या संख्येने मेसेज पाठवणे, ऑटोमॅटिक मेसेजिंग किंवा ऑटो-डायलिंगसारख्या गतिविधी WhatsAppच्या नियमांच्या विरोधात जाऊ शकतात. अशा प्रकारच्या वर्तनाचा शोध घेण्यासाठी WhatsApp मशीन लर्निंग तंत्रज्ञान आणि यूजर रिपोर्ट्सचा वापर करते.(WhatsApp Safety)

याशिवाय अनधिकृत पद्धतीने अकाउंट किंवा ग्रुप तयार करणे तसेच WhatsAppसारखे काम करणारे अनधिकृत अॅप्स वापरणेही धोकादायक ठरू शकते.

3. परवानगीशिवाय नंबर किंवा डेटा वापरू नका

एखाद्या व्यक्तीचा फोन नंबर किंवा वैयक्तिक माहिती तिच्या परवानगीशिवाय शेअर करणे टाळावे. अनधिकृत माध्यमातून मिळालेल्या कॉन्टॅक्ट डेटाचा वापर करून लोकांना मेसेज पाठवणे किंवा ग्रुपमध्ये जोडणेही नियमांचे उल्लंघन ठरू शकते.(WhatsApp Safety)

4. Broadcast Listचा गैरवापर टाळा

Broadcast Listच्या माध्यमातून पाठवलेला मेसेज सामान्यतः त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो, ज्याने तुमचा फोन नंबर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये सेव्ह केलेला आहे. मात्र, वारंवार अनावश्यक Broadcast मेसेज पाठवल्याने यूजर्सकडून रिपोर्ट मिळू शकतात आणि त्यानुसार WhatsApp अकाउंटवर कारवाई करू शकते.(WhatsApp Safety)

या गोष्टीही ठरू शकतात नियमबाह्य

WhatsAppच्या Terms of Serviceनुसार चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवणे, बेकायदेशीर कामांसाठी प्लॅटफॉर्मचा वापर करणे, धमकी देणे, घाबरवणे, Hate Speech किंवा आक्षेपार्ह वर्तन यांसारख्या गोष्टींवरही कारवाई होऊ शकते.

त्यामुळे WhatsApp अकाउंट सुरक्षित ठेवायचे असेल, तर अनावश्यक मेसेजिंग, Bulk Messaging, परवानगीशिवाय डेटा वापरणे आणि Broadcastचा गैरवापर यापासून दूर राहणे महत्त्वाचे आहे.(WhatsApp Safety)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >