मी एकतर पोलिसात तक्रार करू शकतो...! टीम इंडियाच्या खेळाडूच्या तीन बॅट मैदानातून चोरी!

भारतीय संघ सध्या एशियन्स गेम्स 2026 स्पर्धा आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे व्यस्त आहे. पण या दोन्ही संघात दीपक चहर नाही. पण त्याचा सराव मात्र सुरू आहे. असं असताना मैदानावर सराव करत असताना त्याच्यासोबत एक विचित्र प्रकार घडला. मैदानावरून त्याच्या तीन बॅट चोरीला गेल्या आहे. त्यामुळे त्याचा संताप झाला. चोरीला गेलेल्या बॅट्स महागड्या असून एसएसच्या होत्या. प्लेयर एडिशन असलेल्या या बॅट्सची किंमत लाखांच्या घरात असते. त्यामुळे संताप होणं सहाजिकच आहे. मैदानातून बॅट चोरीला गेल्याचं दीपक चाहरच्या लक्षात आल्यानंतर त्याने सुरूवातील शोधाशोध केली. त्यानंतर त्याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि पुढे काय करायचं? असा प्रश्नच चाहत्यांना विचारला. दीपक चहरने हा प्रश्न घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे जावं का? असा पर्यायही विचारला आहे.

काय म्हणाला दीपक चहर?


आपल्या बॅट्स चोरीला गेल्यानंतर दीपक चहरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केली आहे. यात दीपक चहर म्हणाला की, 'काल संध्याकाळी मैदानावरून तीन प्लेयर एडिशन बॅट्स चोरीला गल्या. आता सांगा मी नेमकं काय करू? ज्याने या बॅट चोरल्या त्याला या बॅट्सच्या किंमत माहिती नसेल. त्या तीन बॅट्सची किंमत दीड लाख रुपये होती. आता तो जाऊन त्या किंवा टेनिस बॉलने खेळेल. अरे, भावा माझ्याकडूनच पैसे घ्यायचे होते, मी दिले असते.'



दीपक चहरने पुढे सांगितलं की, 'माझ्याकडे काही पर्याय आहेत. यात पहिलं तर पोलिसात तक्रार करू कि योगींकडे जाऊ की मोदींकडे.. किंवा थेट देवाकडे तक्रार करू. ज्याने ही चोरी केली त्याला बुद्धी मिळो आणि मला बॅट परत करो.. मी त्याला पैसे देईन. नाही तर एसएसला रिक्वेस्ट करून आणि बॅट मागून घेऊ. तुम्हाला काय वाटते? मी काय करायला हवं.'



दीपक चहर सध्या टीम इंडियाबाहेर आहे. वारंवार होत असलेल्या दुखापतीमुळे दीपक चहरचं करिअर संकटात आलं. आता आयपीएल स्पर्धेत खेळत आहे, तसेच टीम इंडियात संधी मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्या मुंबई इंडियन्स संघात आहे. दीपक चहने भारतासाठी 13 वनडे सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत. तर 25 टी20 सामन्यात 31 विकेट घेतल्या आहेत. त्याने वनडेत 33.83 च्या सरासरीने 203 धावाही केल्या आहेत.
Comments
Add Comment

IND vs WI सामन्यासाठी इशान किशन आणि अभिषेक शर्माचा देशी जुगाड! जापानमध्ये असा पाहिला सामना Video

जापानच्या आयची नगोया येथे एशियन गेम्स 2026 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने उपांत्य फेरी गाठली

Sonam Maskar : Asian Gamesमध्ये 'सोनम मस्कर'ची दमदार कामगिरी; 10 मीटर एअर रायफलमध्ये भारताला रौप्यपदक

कामगार क्रीडा भवनाच्या सोनम मस्करची आशियाई क्रीडा स्पर्धेत गरुडझेप मुंबई : जपानमधील आयची-नागोया येथे सुरू

Video: बसमधून उतरताना रोहित शर्मासोबत काय घडलं? विराट कोहलीच्या चेहऱ्यावर दिसली चिंता!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने विजय मिळवला. भारताने 8 गडी

Asian Games 2026: एशियन गेम्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाऊस पडला तर काय? कोण ठरणार विजेता?

एशियन गेम्स 2026 स्पर्धेतील पुरूष क्रिकेट स्पर्धेत वारंवार पावसाचा व्यत्यय येत असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे

Asian Games 2026 : अवघ्या २ सेमीने सुवर्ण हुकलं! लांब उडीत एन्सी सोजनची सुवर्णमयी झेप; भारताला मिळवून दिलं रौप्यपदक!

नागोया : आशियाई खेळ २०२६ (Asian Games 2026) मधील महिलांच्या लांब उडी (Long Jump) स्पर्धेत अत्यंत थरारक आणि नाट्यमय घडामोडी पाहायला

Pinky Balhara Kurash : पिंकी बलहाराचा ऐतिहासिक पराक्रम! ३,५०० वर्षे जुन्या 'कुराश' खेळात दुसऱ्यांदा पदक जिंकणारी ठरली पहिली भारतीय खेळाडू

नवी दिल्ली : आशियाई खेळ २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या पिंकी बलहाराने एका अत्यंत प्राचीन खेळात पदक जिंकून इतिहास