कल्याण: कल्याण- डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कल्याण- डोंबिवली महानगपालिका क्षेत्रामध्ये उद्या अर्थात 29 सप्टेंबर रोजी पाणी कपात केली जाणार आहे. महानगर पालिका क्षेत्रामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातील उपकरणांची देखभाल दुरूस्ती करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण केडीएमसी क्षेत्रामध्ये 12 तासांसाठी पाणीकपात केली जाणार आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये केडीएमसीकरांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावी लागण्याची शक्यता आहे. कोणकोणत्या क्षेत्रामध्ये पाणीकपातीचा प्रश्न भेडसावू शकतो, जाणून घेऊया...
मुंबई: मुंबईतील सार्वजनिक गणपतीच्या विसर्जनासाठी राज्यासह देशभरातून भाविक उपस्थित होते. यावेळी भाविकांसह चोरट्यांचीही मिरवणुकीमध्ये मोठ्या ...
कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिबली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची देखभाल दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. देखभाल दुरुस्तीची कामे करण्याकरिता मंगळवार 29 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत 12 तासांकरिता महानगरपालिकेच्या बाराने, मोहिली, नेतिवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रामधून कल्याण (पूर्व- पश्चिम), कल्याण ग्रामीण विभाग (मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे) आणि डोंबिवली (पूर्व- पश्चिम) परिसरात होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तरी, परिसरातील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करून आणि पुरेसा साठा करून महानगरपालिकेला सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.
दरम्यान, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केडीएमसी क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पडला होता. मुसळधार पाऊसामुळे उल्हास नदीतून जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत उपकरणांना पाणी उचलण्यासाठी ताण येत होता. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विद्युत उपकरणांची दुरूस्तींचे काम करणे आव्हानात्मक असल्यामुळे केडीएमसी क्षेत्रामध्ये पाऊसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर आता हे दुरूस्तीचे काम हाती घेतले. केडीएमसीच्या पाणी पुरवठा विभागाने नागरिकांना सोमवारी येत्या एक- दोन दिवस पुरेल इतका पाणीसाठा भरून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंगळवारी रात्रीनंतर पाणी पुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. पाणी पुरवठा पुर्व पदावर एक- दोन दिवसाची शक्यता आहे. ही शक्यता असल्यामुळे केडीएमसीच्या अधिकाऱ्यांकडूनच नागरिकांना पाणी पुरवठा भरून ठेवण्याचे आवाहन केले.
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. कंटेनरने मागून टेम्पोला धडक दिल्यानंतर दोन्ही वाहने रस्त्यालगतच्या दरीत कोसळली. ...