Mumbai Mobile Theft Gang: लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणूकीमध्ये भाविकांचे 192 मोबाईल चोरीला, पोलिसांनी 18 जणांना केली अटक

लालबागच्या राजाच्या भव्य दिव्य विसर्जन मिरवणुकीमध्ये भाविकांच्या स्मार्ट फोन आणि मौल्यवस्तूंवर डल्ला मारला आहे. सध्या या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

मुंबई: मुंबईतील सार्वजनिक गणपतीच्या विसर्जनासाठी राज्यासह देशभरातून भाविक उपस्थित होते. यावेळी भाविकांसह चोरट्यांचीही मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर हजेरी होती. लालबागच्या राजाच्या भव्य विसर्जन मिरवणुकीमध्ये भाविकांच्या मोबाईलवर डल्ला मारला आहे. विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. ह्याच गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी भाविकांच्या मोबाईलवर डल्ला मारला आहे. चोरट्यांनी अनेक भाविकांच्या खिशांमधून मोबाईल, गळ्यातून सोन्याची चैन आणि इतर मौल्यवान वस्तू चोरल्याचे वृत्त आहे. मुंबईतील अनेक पोलीस चौकींमध्ये आतापर्यंत मोबाईल फोन चोरीच्या सुमारे 200 तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यांनी आतापर्यंत मोबाईल फोन हरवल्याच्या 192 प्रकरणांची अधिकृतपणे नोंद केली आहे.






याव्यतिरिक्त, पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोबाईल फोन आणि सोन्याची चैन चोरीसंबंधित 10 स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या घटनांमुळे पोलिसांनी मिरवणूक मार्गावरील गर्दीच्या भागांमध्ये सक्रिय असलेल्या संशयित टोळ्यांवर तात्काळ कारवाई सुरू केली आहे. लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मोबाईल, सोन साखळी आणि मौल्यवान वस्तू गेल्या प्रकरणी आतापर्यंत एका अल्पवयीन मुलासह १८ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाविकांच्या मोबाईल चोरीच्या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलांचा, तरूणांचा आणि महिलांचाही सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. गर्दीत भाविकांच्या पिशव्यांवर डल्ला मारताना दोन महिलांना पकडण्यात आल्याचे वृत्त आहे.






पोलिसांकडून संशयितांची चौकशी केली जात आहे. तपास अधिकाऱ्यांकडून मुंबईमध्ये अनेक ठिकाणी टोळी सक्रिय आहे. या सक्रिय टोळीतील प्रत्येक सदस्यांची चोरीची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी कायद्याच्या संबंधित कलमांनुसार आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. तपासादरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांकडून 14 चोरीचे मोबाईल फोन आणि सात सोन साखळ्या जप्त केल्या. जप्त केलेल्या ह्या वस्तू आतापर्यंत नोंदवलेल्या एकूण चोरीच्या मौल्यवान वस्तूंपैकीच एक असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मिरवणुकीदरम्यान गहाळ झालेले स्मार्ट फोन, सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू शोधण्याचे प्रयत्न पोलीस पथकांकडून सुरू आहेत.






चोरांच्या सक्रिय टोळीतील संशयित सदस्यांना ओळखण्यासाठी पोलीस विसर्जन मार्गावरील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. संशयितांच्या हालचाली आणि संवादाचा मागोवा घेण्यासाठी पोलीस तांत्रिक निगराणी आणि सायबर सेलची मदतही घेत आहेत. अटक केलेल्या चोरांच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीचा उपयोग त्यांच्या कथित साथीदारांना ओळखण्यासाठी आणि शोधण्यासाठी देखील केला जात आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या प्रचंड गर्दीचा फायदा चोरांच्या टोळींनी केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून, अधिक संशयितांचा शोध घेण्यासाठी आणि चोरीला गेलेला उर्वरित माल परत मिळवण्यासाठी पथके कार्यरत आहेत.
Comments
Add Comment

दिवाळीच्या सुट्टीत चोरट्यांचा डल्ला! बंद घराची खिडकी तोडून चोरांनी लांबवले सोन्याचे दागिने

मुंबई: दिवाळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेर गावी जात असतात. याचाच फायदा घेत, मुंबईतील चुनाभट्टीमध्ये

Mumbai Local Mega Block:  15 नोव्हेंबरला लोकलचा मेगा ब्लॉक; ठाणे-कल्याणसह पनवेल-वाशी मार्गावर वाहतुकीत बदल

Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी दिनांक 15 नोव्हेंबर

मुंबईत शिवशस्त्र शौर्यगाथेचा ऐतिहासिक ठेवा! वाघनखे, तलवारी पाहण्याची संधी; पुढील 6 महिने प्रदर्शन खुले

[caption id="attachment_1074960" align="aligncenter" width="800"] मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या विशेष

Mumbai Local: 26 ऑक्टोबरच्या मध्य रेल्वेवरील कांजूरमार्ग स्थानकावरील दुर्घटनेमागील नेमकं कारण काय? रेल्वेचा प्राथमिक निष्कर्ष समोर

मुंबई: कांजुरमार्ग रेल्वे स्थानकाजवळ सिग्नलिंग आणि दूरसंचार (S&T) यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे गेल्या

दुष्काळग्रस्तांसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मोठा निर्णय; एक महिन्याचे 2 लाखांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणार

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात सध्या दुष्काळाचे अत्यंत तीव्र स्वरूप पाहायला मिळत असून राज्यातील अनेक भागांना

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! आता सोमवारी 'या' भागांत 24 तास नळ कोरडे राहणार; वाचा संपूर्ण यादी

ठाणे: ठाणे शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंतेची बातमी समोर आली आहे. संभाव्य दुष्काळसदृश