Monday, September 28, 2026

Ketan Agrawal Case : ‘शांत बस, नाहीतर तुलाही फेकून देईन’; केतन अग्रवाल प्रकरणात प्रत्यक्षदर्शीने पोलिसांसमोर उघड 'त्या' क्षणाचा मोठा खुलासा

Ketan Agrawal Case : ‘शांत बस, नाहीतर तुलाही फेकून देईन’; केतन अग्रवाल प्रकरणात प्रत्यक्षदर्शीने पोलिसांसमोर उघड 'त्या' क्षणाचा मोठा खुलासा
पुणे : लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांचा तपास अत्यंत वेगाने सुरू असून, त्यात दोन अत्यंत महत्त्वाचे पुरावे हाती आले आहेत. पहिला पुरावा म्हणजे घटनेच्या दिवशी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीने दिलेला जबाब आणि दुसरा म्हणजे फॉरेन्सिक तपासणीतून समोर आलेला तब्बल 12 टीबीचा डिजिटल डेटा. या दोन्ही पुराव्यांमुळे या प्रकरणाला मोठा वळण मिळालं आहे.

त्या दिवशी नेमकं काय घडलं ? प्रत्यक्षदर्शीने सांगतिला घटनाक्रम

23 जून रोजी एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला. गडावर चढताना त्याने केतन आणि सिया यांच्यासोबत चेतनला पाहिलं होतं. कडक उन्हातही चेतनने हुडी घातली असल्यामुळे प्रत्यक्षदर्शीच्या तो लक्षात राहिला. गडावर गेल्यावर सियाने चेतनच्या दिशेने इशारा केला आणि नंतर खाली बसून केतनच्या पायावर लाथ मारली. त्याच क्षणी चेतनने मागून धावत येत केतनला दरीत ढकलून दिलं, असा दावा या प्रत्यक्षदर्शीने केला आहे.
हा प्रकार पाहिल्यानंतर त्याने चेतनला विचारणा केली असता, शांत बस नाहीतर तुलाही दरीत फेकून देईन, अशी धमकी चेतनने त्याला दिली. घाबरलेल्या प्रत्यक्षदर्शीने काही दिवस ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही, मात्र बातम्या पाहिल्यानंतर त्याने स्वतः पोलिसांशी संपर्क साधला.

क्राईम पॉडकास्ट आणि ChatGPT चा वापर

दुसरीकडे, पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमने 6 मोबाईल, 9 पेनड्राइव्ह आणि डिजिटल बॅकअपमधून 12 टीबी डेटा पुनर्प्राप्त केला आहे. संशयितांनी आयफोनमधील डेटा कायमचा कसा डिलीट करायचा, चॅट हिस्टरी कशी मिटवायची, तसेच पोलिसांच्या तपासापासून कसे वाचायचे, याबद्दल इंटरनेट, युट्यूब आणि परदेशी पॉडकास्टवर सर्च केल्याचे उघड झाले आहे. आरोपींनी कटासाठी कोणतेही कोडवर्ड न वापरता थेट भाषेत संभाषण केल्याचेही डिलीट केलेल्या चॅट्समधून समोर आले आहे. आता प्रत्यक्षदर्शीचा जबाब आणि हा डिजिटल डेटा यांची सांगड घालून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >