Monday, September 28, 2026

कच्च्या तेलाचा फटका! शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स 1,124 अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे 8.77 लाख कोटी बुडाले

कच्च्या तेलाचा फटका! शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स 1,124 अंकांनी गडगडला, गुंतवणूकदारांचे 8.77 लाख कोटी बुडाले

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेली मोठी वाढ, पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली सातत्यपूर्ण विक्री यामुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. या प्रचंड पडझडीमुळे सेन्सेक्स 73 हजारांच्या खाली, तर निफ्टी 22,800 अंकांपेक्षाही खाली पोहोचला आहे.(crude oil price hike)

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण

दिवसाच्या सुरुवातीपासूनच बाजारात मंदीचे सावट होते. व्यवहार सुरू होताच सर्वच प्रमुख क्षेत्रांवर विक्रीचा प्रचंड दबाव वाढला.

सेन्सेक्स: दिवसभरात 1179 अंकी घाणीपर्यंत घसरल्यानंतर, अखेरच्या सत्रात काहीशी सावरत 1124.02 अंकांच्या (1.52%) घसरणीसह 72,771.72 अंकांवर बंद झाला.

निफ्टी: निफ्टीमध्येही 360.25 अंकांची (1.56%) घसरण नोंदवली गेली आणि तो 22,780.25 अंकांवर स्थिरावला.

गुंतवणूकदारांचे 8.77 लाख कोटी रुपयांचे नुकसान

या मोठ्या विक्री सत्रामुळे मुंबई शेअर बाजारातील (BSE) नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य 483.25 लाख कोटी रुपयांवरून घसरून 474.48 लाख कोटी रुपयांवर आले. परिणामी, एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 8.77 लाख कोटी रुपयांची मोठी घट झाली.

क्षेत्रीय निर्देशांक आणि समभागांची स्थिती

बँकिंग, भांडवली वस्तू (कॅपिटल गुड्स), सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या (PSU), ऑइल अँड गॅस, धातू (Metal), वाहन (Auto) आणि एफएमसीजी (FMCG) या सर्वच प्रमुख क्षेत्रांना मोठा फटका बसला. निफ्टी बँक निर्देशांक 1.99%, कॅपिटल गुड्स 2% आणि मिडकॅप-स्मॉलकॅप निर्देशकांमध्येही अनुक्रमे 1.63% व 1.85% घसरण नोंदवली गेली.

दिवसभरातील व्यवहारात 4717 समभागांपैकी तब्बल 3,106 समभाग घसरणीसह लाल रंगात बंद झाले, तर केवळ 1,359 समभागांमध्ये वाढ झाली. सेन्सेक्समधील 30 पैकी मोजक्याच समभागांना दिलासा मिळाला असून डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज आणि इन्फोसिसचे समभाग काही प्रमाणात वधारले. मात्र, टीएमपीव्ही, अदानी एंटरप्रायझेस, जिओ फायनान्शियल, लार्सन अँड टुब्रो आणि अदानी पोर्ट्सच्या समभागांमध्ये मोठी बिकवाली झाली.(crude oil price hike)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >