विराट कोहली हे क्रिकेटविश्वातील खूप मोठं नाव आहे. भारतीय क्रिकेटविश्वात सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक नावलौकिक मिळवलेला खेळाडू आहे. विराट कोहलीने टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र वनडे फॉर्मेटमध्ये त्याचा झंझावात सुरूच आहे. त्याचा आक्रमक बाणा आजही तसाच आहे. मैदानात उतरला की आपल्या शैलीत गोलंदाजांना सळो की पळो करून सोडतो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने झंझावाती शतक ठोकलं. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 86वं शतक होतं. या शतकी खेळीसह त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहे. त्याने आतापर्यंत ठोकलेल्या 86 शतकांपैकी 60 शतकं संघाला विजय मिळवून देणारी आहे. हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठा विक्रम असून त्याच्या आसपासही कोणी नाही. दुसरीकडे, विराट कोहलीच्या शतकांबाबत एक आश्चर्यकारक आकडा समोर आला आहे. यात आठवड्याच्या कोणत्या दिवशी त्याने सर्वाधिक शतकं ठोकली याबाबत सांगितलं गेलं आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीसाठी रविवार हा खास ठरला आहे. त्याने रविवारी एकूण 27 शतकं ठोकली आहे. आठवड्यातील इतर वारांच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. त्यानंतर गुरूवार हा त्याच्यासाठी बेस्ट वार ठरला आहे. या दिवशी विराट कोहलीने 15 शतकं ठोकली आहेत. तर बुधवारी 12 आणि शनिवारी 11 शतकं नावावर केली आहेत. शुक्रवारी विराट कोहलीने 9 शतकं, मंगळवारी 7 शतकं ठोकली आहेत. सोमवार हा विराट कोहलीसाठी आकडेवारीनुसार काही खास नाही. त्याने या दिवशी एकूण 5 आंतरराष्ट्रीय शतकं ठोकली आहेत.
विराट कोहलीचा 60 शतकांचा विक्रम मोडणं खूपच कठीण! असं का ते जाणून घ्या
वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला वनडे सामना भारताने 8 गडी राखून जिंकला. या विजयात कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली यांचं योगदान महत्त्वाचं ठरलं. कारण या ...
सोमवार असो की मंगळवार,
विराट कोहलीने आठवड्याच्या प्रत्येक वाराला शतक ठोकलं आहे. विराट कोहली शतकांच्या शतकापासून अजून 14 शतकं दूर आहे. आता येणाऱ्या काही मालिकांमध्ये लवकरच 90 शतकं पूर्ण करेल असं दिसत आहे. जर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली नसती तर हा आकडा अधिक असता. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकांचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. वनडे वर्ल्डकप 2027 पर्यंत विराट कोहली किती शतकं ठोकतो, याकडे आता क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.