
मुंबई: राज्य शासनाने शुक्रवारी (२० नोव्हेंबर) चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले. यामध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्यासह चार अधिकाऱ्यांकडे नव्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
कोणाची कुठे बदली?
-
अशोक वामन काकडे (IAS: 2010): महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे (MAIDC) व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असलेल्या काकडे यांची मंत्रालयातील दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
-
प्रवीण कुंडलिक पुरी (IAS: 2011): उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव म्हणून कार्यरत असलेल्या पुरी यांची महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे.
-
गुलाब राजाराम खरात (IAS: 2013): यांची महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
-
मकरंद प्रल्हाद देशमुख (IAS: 2013): मुख्यमंत्री सचिवालयातील मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव म्हणून कार्यरत असलेल्या देशमुख यांची मुंबईतील राज्य कर विभागाच्या सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.






