‘मफलरवाला’ नेता कोण? १० ऑक्टोबरला नाव जाहीर करणार- अजित पवारांच्या अपघातप्रकरणी रोहित पवारांचा दावा

व्हीएसआर कंपनीला सत्तेच्या जोरावर वाचविले जात असल्याचा आरोप


मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या प्रकरणात व्हीएसआर कंपनीला वाचविणाऱ्या एका बड्या नेत्याचा येत्या १० ऑक्टोबरला पर्दाफाश करणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी सोमवारी केला. या नेत्याने एका कार्यक्रमात डिझाइनचा मफलर घातला होता, त्यामुळे आपण त्याला ‘मफलरवाला नेता’ असे संबोधत असल्याचे त्यांनी सांगितले.


अजित पवार यांच्या अपघाताला आठ महिने उलटूनही सरकार आणि सीआयडीकडून अपेक्षित तपास होत नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणातील तांत्रिक तसेच गुन्हेगारी तपासाबाबत प्रश्न उपस्थित करताना त्यांनी एआयबीच्या अहवालाची प्रतीक्षा केली जात असल्याचे म्हटले. अजित पवार यांना लोक विसरतील, असे सरकारला वाटत असेल; मात्र तसे होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.


‘मफलर’च्या मागे एक चेहरा असून त्या व्यक्तीचे नाव आणि छायाचित्र १० ऑक्टोबरच्या मुंबईतील पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येईल, असा दावा पवार यांनी केला. व्हीएसआर कंपनीला आणि तिला वाचविणाऱ्या व्यक्तीला संबंधित नेता सत्तेचा वापर करून संरक्षण देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, या आरोपांच्या समर्थनार्थ कोणते पुरावे आहेत, याचा तपशील त्यांनी या पत्रकार परिषदेत उघड केला नाही.


आपण ज्या व्यक्तीविषयी माहिती जाहीर करणार आहोत, तो मोठा नेता असल्याने काही जण मला सुरक्षेची काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत, असे पवार म्हणाले. मात्र, माझे लोकच माझे संरक्षण करतील, असे त्यांनी सांगितले. १० ऑक्टोबरच्या सादरीकरणाच्या अनेक प्रती वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या असल्याचा दावाही त्यांनी केला.


अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासात काही बाबी दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही पवार यांनी केला. विमानातील घडामोडी, ब्लॅक बॉक्स आणि त्याच्या तपासाबाबत यापूर्वी आपण काही मुद्दे उपस्थित केले होते, असे त्यांनी सांगितले. ब्लॅक बॉक्सची शहानिशा सुरू असून तो कॅनडा आणि अमेरिकेला पाठविण्याची मागणी करण्यात आली होती, असेही त्यांनी नमूद केले.



सीआयडी एआयबीच्या अहवालाची प्रतीक्षा


अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी सीआयडीवर सुरुवातीला आपला विश्वास होता. मात्र, सध्या सीआयडी एआयबीच्या अहवालाची प्रतीक्षा करीत आहे. तांत्रिक तपास आणि गुन्हेगारी तपास यामध्ये फरक असतो; त्यानुसार तपासाची दिशा काय असावी, याबाबतही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. अजित पवार हयात असते तर शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांवर तातडीने मदत केली असती, असे सांगत त्यांच्या निधनानंतर सामान्य नागरिकांचे नुकसान होत असल्याचेही रोहित यांनी म्हटले. सरकारकडून तपासात विलंब होत असल्याचा आरोप करत त्यांनी १० ऑक्टोबरच्या पत्रकार परिषदेत या प्रकरणासंदर्भातील अधिक माहिती आणि संबंधित नेत्याचे नाव जाहीर करण्याचे संकेत दिले.

Comments
Add Comment

Illegal Sand Mining : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यावर महसूल विभागाची कारवाई

- अवैध वाळू उत्खननप्रकरणी ४.९० कोटींचा दणका; दंडातून वगळण्याचा तहसीलदारांचा आदेश रद्द मुंबई : मनोज जरांगे पाटील

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाची चिंता कायम; 265 तालुक्यांत दुष्काळाची नोंद; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात यंदा पावसाची स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक भागांत अजूनही

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे आज दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर

मुंबई : दुष्काळामुळे तलावांमधील मत्स्यव्यवसायावर झालेला परिणाम आणि नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या समस्या जाणून

Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रामध्ये पुन्हा हवामान बदल, 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट; मुंबई- पुण्याची स्थिती काय?

मुंबई: गणेशोत्सवानंतर राज्यातील हवामानात पुन्हा मोठे फेरबदल जाणवणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या

 Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता जमा होण्यास सुरुवात

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ऑगस्ट 2026

Pune News: "वय केवळ आकडा..." पुण्यामध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत आजींचा भन्नाट डान्स; पाहा Video

पुणे: नुकतंच आपण सर्वांनी गणरायाला जड अंत:करणाने भावपूर्ण निरोप दिला. अनेक ठिकाणी गणरायाच्या विसर्जनासाठी