WPL 2027 Retention: डिफेंडिंग चॅम्पियन RCB कडून धक्कादायक निर्णय; पाहा पाच संघांची संपूर्ण रिटेन-रिलीज यादी

वुमन्स प्रीमियर लीग 2027 हे स्पर्धेचं पाचवं पर्व आहे. या स्पर्धेसाठी पाचही फ्रेंचायझींनी कंबर कसली आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि आरसीबीचं वर्चस्व दिसून आलं आहे. आता पाचव्या पर्वाची तयारी सुरू झाली आहे. पाचही फ्रेंचायझींचा जेतेपदाचा मानस आहे. या स्पर्धेपूर्वी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. असून रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यासाठी 28 सप्टेंबर 2026 ही शेवटची तारीख बीसीसीआयने दिली होती. ही डेडलाईन लक्षात घेऊन फ्रेंचायझींनी एक महिन्याआधी रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी फ्रेंचायझींनी जाहीर केली आहे. पाचही फ्रेंचायझींनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंबाबत खुलासा केला आहे. फ्रेंचायझींनी जाहीर केलेल्या यादीतील काही निर्णय आश्चर्यकारक आहेत. यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रेंचायझीने घेतलेला निर्णय पाहून क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण आक्रमक फलंदाजी करणाऱ्या ग्रेस हॅरिसला रिलीज केलं आहे. तर मुंबई इंडियन्सने युवा स्टार जी कमलिनी, दिल्ली कॅपिटल्सने अनुभवी स्पिनर स्नह राणाला रिलीज केलं आहे.

कोण रिटेन आणि कोण रिलीज?


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु



  • रिलीज: ग्रेस हॅरिस, लिन्सी स्मिख, डी हेमलता, गौतमी नायक

  • रिटेन:स्मृति मंधाना, एलिस पेरी, जॉर्जिया वॉल, लॉरेन बेल, नदीन डी क्लर्क, अरुंधति रेड्डी, पूजा वस्त्रकार, प्रत्यूषा कुमार, प्रेमा रावत, राधा यादव, ऋचा घोष, सयाली सतघारे, श्रेयंका पाटिल

  • स्लॉट: 5 (2 विदेशी)


मुंबई इंडियन्स





    • रिलीज: मिली इलिंगवर्थ, जी कमलिनी, क्रांति रेड्डी, पूनम खेमनार, सायका इशक, त्रिवेणी वशिष्ठ

    • रिटेन: मेली कर्र, हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, निकोला कॅरी, अमनजोत कौर, हरमनप्रीत कौर, राहिला फिरदौस, एस सजाना, संस्कृति गुप्ता, शबनिम इस्माइल, वैष्णवी शर्मा

    • स्लॉट: 7 (एक विदेशी)






दिल्ली कॅपिटल्स



  • रिलीज: अलाना किंग, लिजेल ली, स्नेह राणा, तानिया भाटिया, प्रगति सिंह, एडला सृजना

  • रिटेन: एनाबेल सदरलँड, शिनेल हेनरी, लॉरा वॉल्वार्ट, लूसी हॅमिल्टन, मारिजान कॅप, दीया यादव, जेमिमा रॉड्रिग्स, ममता मडीवाला, मिन्नू मणी, श्री चरणी, नंदनी शर्मा, निकी प्रसाद, शेफाली वर्मा

  • स्लॉट: 5 (एक विदेशी)



यूपी वॉरियर्स



  • रिलीज: एमी जोन्स, चार्ली नॉट, क्लोई ट्रायॉन, डिआंड्रा डॉटिन, आशा शोभना, जी तृषा, किरण नवगिरे, श्वेता सहरावत, सुमन मीना

  • रिटेन: मेग लॅनिंग, फीबी लिचफील्ड, सोफी एक्लेस्टन, तारा नॉरिस, दीप्ति शर्मा, हरलीन देओल, क्रांति गौड, प्रतिका रावल, शिखा पांडे, शिप्रा गिरी, सिमरन शेख

  • स्लॉट: 11 (2 विदेशी)


गुजरात जायंट्स



  • रिलीज: डॅनियल वायट-हॉज, आयुषी सोनी, तितास साधु, शिवानी सिंह

  • रिटेन: एश्ले गार्डनर, बेथ मूनी, जॉर्जिया वेयरहम, किम गार्थ, सोफी डिवाइन, अनुष्का शर्मा, भारती फूलमाली, हैप्पी कुमारी, जिंतीमनी कलिता, कनिका आहूजा, काश्वी गौतम, राजेश्वरी गायकवाड़, रेणुका सिंह, तनुजा कंवर, यास्तिका भाटिया

  • स्लॉट: 3 (एक विदेशी)

Comments
Add Comment

Asian Games 2026 : नीरज चोप्राच्या अनुपस्थितीतही भारताची चमकदार कामगिरी; यशवीर सिंगला रौप्य तर रोहित यादवला कांस्यपदक

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भारताचा

SA vs AUS: कसोटी मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेचा जखमी खेळाडूवर डाव, 3 वर्षानंतर हा गोलंदाज परतणार

दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला वनडे मालिकेत मात खावी लागली आहे. तीन सामन्यांची वनडे

Asian Games 2026 : गुलवीर सिंगचा धावण्याच्या ट्रॅकवर जलवा! 1500 मीटरमध्ये रौप्यपदक; भारताच्या खात्यात आणखी एक पदक

नागोया (जपान) : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय खेळाडूंनी आपली चमकदार कामगिरी सुरूच ठेवलीय. जपानमधील नागोया

मी एकतर पोलिसात तक्रार करू शकतो...! टीम इंडियाच्या खेळाडूच्या तीन बॅट मैदानातून चोरी!

भारतीय संघ सध्या एशियन्स गेम्स 2026 स्पर्धा आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे व्यस्त आहे. पण या दोन्ही संघात दीपक चहर

IND vs WI सामन्यासाठी इशान किशन आणि अभिषेक शर्माचा देशी जुगाड! जापानमध्ये असा पाहिला सामना Video

जापानच्या आयची नगोया येथे एशियन गेम्स 2026 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने उपांत्य फेरी गाठली

Sonam Maskar : Asian Gamesमध्ये 'सोनम मस्कर'ची दमदार कामगिरी; 10 मीटर एअर रायफलमध्ये भारताला रौप्यपदक

कामगार क्रीडा भवनाच्या सोनम मस्करची आशियाई क्रीडा स्पर्धेत गरुडझेप मुंबई : जपानमधील आयची-नागोया येथे सुरू