Asian Games 2026 : नीरज चोप्राच्या अनुपस्थितीतही भारताची चमकदार कामगिरी; यशवीर सिंगला रौप्य तर रोहित यादवला कांस्यपदक

नीरज चोप्राच्या अनुपस्थितीतही भारतीय खेळाडूंनी भालाफेकीत शानदार कामगिरी करत देशाच्या पदकतालिकेत आणखी भर घातली. यशवीर सिंगने रौप्यपदक, तर रोहित यादवने कांस्यपदक पटकावत भारताचा तिरंगा उंचावला.

नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्या अनुपस्थितीतही भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत दोन पदके आपल्या नावावर केली. यशवीर सिंग याने शानदार प्रदर्शन करत रौप्यपदक पटकावले, तर रोहित यादव याने कांस्यपदक जिंकून भारताच्या पदक तालिकेत भर घातली.



नीरजच्या अनुपस्थितीतही भारताची दोन पदके


मागील दोन आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज चोप्रा या स्पर्धेत खेळला नाही. त्यामुळे सुवर्णपदक भारताला मिळाले नसले, तरी भारतीय खेळाडूंनी मागील वेळेप्रमाणेच दोन पदके जिंकण्याची परंपरा कायम राखली. श्रीलंकेच्या रोमेश पाथिरागे याने अपेक्षेप्रमाणे सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत रोमेश पाथिरागे आणि ऑलिम्पिक चॅम्पियन अर्शद नदीम यांसारखे तगडे दावेदार असतानाही भारतीय खेळाडूंनी उत्तम संघर्ष केला.(ohit Yadav Bronze Medal)






रोमांचक सामना आणि भारतीय खेळाडूंची कामगिरी


स्पर्धेच्या सुरुवातीला पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये दोन्ही भारतीय खेळाडूंनी मैदान गाजवले होते. पहिल्या फेरीत 83.56 मीटर भालाफेक करून रोहित यादव दुसऱ्या स्थानावर होता, तर तिसऱ्या फेरीत 84.31 मीटर फेफेक करत त्याने थेट पहिले स्थान पटकावले होते. याशिवाय, 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या यशवीर सिंगने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत रौप्यपदक जिंकले. तर मागील आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या रोहित यादवने यावेळी कांस्यपदक पटकावले. जरी सुवर्णपदक श्रीलंकेच्या रोमेश पाथिरागेकडे गेले असले, तरी नीरज चोप्राशिवाय उतरलेल्या भारतीय भालाफेकपटूंनी मिळवलेले हे यश अत्यंत अभिमानास्पद ठरले आहे.(Yashvir Singh Silver Medal)

Comments
Add Comment

India vs New Zealand Test : टीम इंडियाला मोठा धक्का ! आकाशदीप दुसऱ्या कसोटीतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी

India vs New Zealand Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची घसरगुंडी! 240 धावांची अजूनही पिछाडी

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या दिवशी

आकाशदीपचा क्राइस्टचर्चमध्ये 'पंजा'; न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांत आटोपला, ब्लंडेलचे शतक हुकले...

मुंबई: क्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात