Monday, September 28, 2026

SA vs AUS: कसोटी मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेचा जखमी खेळाडूवर डाव, 3 वर्षानंतर हा गोलंदाज परतणार

SA vs AUS: कसोटी मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेचा जखमी खेळाडूवर डाव, 3 वर्षानंतर हा गोलंदाज परतणार
दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला वनडे मालिकेत मात खावी लागली आहे. तीन सामन्यांची वनडे मालिका दुसऱ्या सामन्यानंतर 0-2 ने गमावली आहे. त्यामुळे तिसरा सामना औपचारिक असणार आहे. असं असताना दक्षिण अफ्रिकेने कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. 9 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी 18 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी संघ निवडताना दक्षिण अफ्रिकन निवडकर्त्यांनी मोठा डाव टाकला आहे. दुखापतीने त्रस्त असलेल्या वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाची संघात निवड केली आहे. दक्षिण अफ्रिकन संघाने 28 सप्टेंबरला निवडलेल्या संघात कागिसो रबाडाचं नाव पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.कारण काही दिवसांपूर्वी रबाडाला दुखापत झाली होती. त्यामुळे वनडे मालिकेला मुकला होता. मात्र आता त्याचं नाव कसोटी संघात आहे. कागिसो रबाडाचं नाव असलं तरी 9 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळेल की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे. जर खेळणार असेल तर पहिल्या सामन्यात खेळेल का? की दुसऱ्या सामन्यापासून संघात येईल? हा देखील प्रश्न आहे. माहितीनुसार, या कसोटी मालिकेपूर्वी दक्षिण अफ्रिकेने इंट्रा स्क्वॉड सराव सामना खेळणार आहे. यात रबाडाच्या फिटनेसची चाचणी घेतली जाईल. त्यानंतर त्याच्यावर निर्णय घेतला जाईल.
कसोटी मालिकेत रबाडाच नाही, तर आणकी एका वेगवान गोलंदाजाने लक्ष वेधून घेतलं आहे. वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया याची संघात निवड झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नॉर्खिया फिटनेसच्या कारणामुळे संघाच्या बाहेर होता. त्यामुळे मागच्या साडे तीन वर्षांपासून कसोटी सामना खेळलाच नाही. मार्च 2023 मनंतर पहिल्यांदा कसोटी सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. नॉर्खियाने 19 कसोटी सामन्यात 70 विकेट घेतले असून जर फिट झाला तर ऑस्ट्रेलियाला महागात पडू शकते. कसोटी मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेचा संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), मार्कस एकरमॅन, डेविड बेडिंगहम, कॉर्बिन बॉश, जेराल्ड कोएत्झी, टोनी डी जॉर्जी, सायमन हारमर, मार्को यानसन, केशव महाराज, एडन मार्करम, वियान मुल्डर, सेनुरान मुथुसामी, एनरिक नॉर्खिया, डेन पॅटरसन, कगिसो रबाडा, रायन रिकलटन, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेना.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >