एका रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट संघ आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळलेल्या मोहित शर्माकडे आयपीएल 2027 स्पर्धेसाठी जबाबदारी सोपवली आहे.चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन यांच्या माहितीच्या आधारे हे वृत्त दिलं गेलं आहे. या वृत्तानुसार, फ्रेंचायझीने उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाला गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका सोपवली आहे. मुख्य प्रशिक्षक झहीर खान याने मोहितच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर त्याची संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये निवड केली आहे. मोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्ससोबत पहिल्यांदाच येत असं नाही. खेळाडू असताना मोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्ससाठी चार पर्वात खेळला होता.
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचं यजमानपद तीन देशांकडे आहे. दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया हे देश यजमान आहेत. ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ...
मोहित शर्माने 2013 मध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी डेब्यू केलं होतं. त्यानंतर 2015 पर्यंत या संघासोबत होता. त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा एकदा संघाचा भाग झाला होता. त्याने चेन्नई सुपर किंग्ससाठी 48 सामन्यात 58 विकेट घेतल्या आहेत. पण चेन्नई सुपर किंग्सने जेतेपद मिळवलेल्या संघाचा भाग कधीच नव्हता. 2023 मध्ये सीएसकेच्या शेवटच्या आयपीएल विजेतेपदाच्या प्रवासात मोहित शर्माच अडथळा ठरला होता. गुजरात टायटन्सकडून खेळताना मोहितने अंतिम सामन्याच्या 18व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धोनीला बाद केले होते. त्याने शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूपर्यंत गुजरातला सामन्यात ठेवलं होते. पण जडेजाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून विजेतेपद मिळवून दिलं.