Tuesday, September 29, 2026

वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 10 शतकं ठोकूनही शुभमन गिल अनलकी! असं का म्हणाला आर अश्विन?

वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 10 शतकं ठोकूनही शुभमन गिल अनलकी! असं का म्हणाला आर अश्विन?
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघाची बांधणी केली जात आहे. त्याचीच चाचपणी म्हणून आता प्रत्येक वनडे मालिका महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेकडे पाहिलं जात आहे. असं असताना पहिल्याच वनडे सामन्यात भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली. वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून धुव्वा उडवला. या सामन्यात कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी झंझावाती शतकं ठोकली. शुभमन गिलने 110 धावांची खेळी केली. तर विराट कोहलीसोबत 132 चेंडूत 151 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताचा विजय सोपा झाला. या विजयामुळे कर्णधार शुभमन गिलवर स्तुतीसुमनं उधळली जात आहे. पण असं असूनही शुभमन गिल अनलकी असल्याचं मत माजी क्रिकेटपूट आर अश्विनचं आहे.

शुभमन गिल अनलकी असण्याचं कारण की..

शुभमन गिलने वनडे फॉर्मेटमध्ये दहा शतकं ठोकली आहेत. सर्वात वेगवान शतकं ठोकणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर जागतिक क्रिकेटमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. गिलने 67 वनडे सामन्यात 10 शतकं, हाशिम अमलाने 57 वनडे डावात 10 शतकं, तर डिकॉकने 55 वनडे डावात ही कामगिरी केली आहे. आर अश्विनचं म्हणणं आहे की, शुभमन गिल अनलकी आहे. शुभमन गिल वनडे क्रिकेटमध्ये चांगली खेळत आहे. पण हा फॉर्मेट आता संपत असल्याचं आर अश्विनचं म्हणणं आहे. वनडे सामने आधीच्या तुलनेत खूपच कमी होत आहेत. त्यामुळे शुभमन गिलला विराट कोहलीच्या जवळपास पोहोचणं कठीण जाईल.
दुसरीकडे, आर अश्विनने शुभमन गिलच्या शॉट सिलेक्शनचं कौतुक केलं. गिल हा विराट कोहलीच्या तोडीस तोड फलंदाज असल्याचं मतही त्याने मांडलं. शुभमन गिलने आतापर्यंत 68 वनडे सामने खेळले असू 3489 धावा केल्या आहे. त्याची बॅटिंग सरासरी ही 60.16 इतकी ठआहे. यात त्याने 10 शतकं आणि 20 अर्धशतकं ठोकली आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही जवळपास 101चा आहे. शुभमन गिल भविष्यात कोणते विक्रम मोडते? याकडेही क्रीडाप्रेमींचं लक्ष आहे. कारण त्याचा फॉर्म कायम राहिला तर नक्कीच चांगली कामगिरी करू शकतो.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >