शुभमन गिल अनलकी असण्याचं कारण की..
शुभमन गिलने वनडे फॉर्मेटमध्ये दहा शतकं ठोकली आहेत. सर्वात वेगवान शतकं ठोकणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर जागतिक क्रिकेटमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. गिलने 67 वनडे सामन्यात 10 शतकं, हाशिम अमलाने 57 वनडे डावात 10 शतकं, तर डिकॉकने 55 वनडे डावात ही कामगिरी केली आहे. आर अश्विनचं म्हणणं आहे की, शुभमन गिल अनलकी आहे. शुभमन गिल वनडे क्रिकेटमध्ये चांगली खेळत आहे. पण हा फॉर्मेट आता संपत असल्याचं आर अश्विनचं म्हणणं आहे. वनडे सामने आधीच्या तुलनेत खूपच कमी होत आहेत. त्यामुळे शुभमन गिलला विराट कोहलीच्या जवळपास पोहोचणं कठीण जाईल.
Shubman gill fans ye dar Sahi hai 🤣😭 pic.twitter.com/I3NgEnIpLL
— Gill@77 (@Shraddh34436813) September 28, 2026
आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. 1 ऑक्टोबर 2026 रोजी जपानमधील निशिन ...
दुसरीकडे, आर अश्विनने शुभमन गिलच्या शॉट सिलेक्शनचं कौतुक केलं. गिल हा विराट कोहलीच्या तोडीस तोड फलंदाज असल्याचं मतही त्याने मांडलं. शुभमन गिलने आतापर्यंत 68 वनडे सामने खेळले असू 3489 धावा केल्या आहे. त्याची बॅटिंग सरासरी ही 60.16 इतकी ठआहे. यात त्याने 10 शतकं आणि 20 अर्धशतकं ठोकली आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही जवळपास 101चा आहे. शुभमन गिल भविष्यात कोणते विक्रम मोडते? याकडेही क्रीडाप्रेमींचं लक्ष आहे. कारण त्याचा फॉर्म कायम राहिला तर नक्कीच चांगली कामगिरी करू शकतो.