आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. 1 ऑक्टोबर 2026 रोजी जपानमधील निशिन येथील आयची प्रीफेक्चरल कोरोगी स्पोर्ट्स पार्कमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
उपांत्यपूर्व फेरीतील सामने पावसामुळे रद्द झाल्याने भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. भारताचा अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नियमानुसार, सामना रद्द झाल्यानंतर अधिक चांगले ICC T20 आंतरराष्ट्रीय मानांकन असलेल्या भारताला पुढील फेरीत प्रवेश देण्यात आला. (India vs Sri Lanka)
भारताची अडथळा शर्यतपटू विथ्या रामराज हिने 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मोठी कामगिरी केली आहे. आयची-नागोया येथे झालेल्या महिलांच्या 400 मीटर अडथळा ...
श्रीलंकेच्या बाबतीतही अशीच परिस्थिती निर्माण झाली. नेपाळविरुद्धचा त्यांचा उपांत्यपूर्व सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे मानांकनाच्या आधारे श्रीलंकेला उपांत्य फेरीत स्थान मिळाले.
भारतीय संघात संजू सॅमसन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अभिषेक शर्मा, यश ठाकूर, अर्शदीप सिंग, तिलक वर्मा, रवी बिश्नोई, विपराज निगम आणि वैभव सूर्यवंशी यांचा समावेश आहे. ( Asian Games Cricket)
श्रीलंकेच्या संघात निरोशन डिकवेला, बिनुरा फर्नांडो, चमिका करुणारत्ने, दुशान हेमंथा, सहान अरचिगे, थारिंदू रथनायके, नुवान तुषारा, अशेन बंडारा, लसिथ क्रॉसपुल्ले, नुवानिडू फर्नांडो आणि विजयकांत व्यासकांत यांचा समावेश आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना दोन्ही संघांसाठी अंतिम फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश करेल.