भारताची अडथळा शर्यतपटू विथ्या रामराज हिने 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मोठी कामगिरी केली आहे. आयची-नागोया येथे झालेल्या महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत विथ्याने 54.75 सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत कांस्यपदक पटकावले. या कामगिरीसह तिने महान धावपटू पी. टी. उषा यांच्या नावावर असलेला राष्ट्रीय विक्रमही मोडला. (Asian Games 2026)
विथ्या रामराजचा विक्रमवीर कांस्यपदकावर ठसा
पी. टी. उषा यांनी 8 ऑगस्ट 1984 रोजी लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये 55.42 सेकंदांची वेळ नोंदवली होती. 2023 च्या हांगझू आशियाई क्रीडा स्पर्धेत विथ्यानेही 55.42 सेकंदांची वेळ नोंदवत या विक्रमाची बरोबरी केली होती. आता नागोया येथे तिने आपल्या वेळेत 0.67 सेकंदांची सुधारणा करत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. (Vithya Ramraj)
विराट कोहली हे क्रिकेटविश्वातील खूप मोठं नाव आहे. भारतीय क्रिकेटविश्वात सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक नावलौकिक मिळवलेला खेळाडू आहे. विराट कोहलीने टी20 ...
या शर्यतीत भारताची अनु राघवन हिने 55.88 सेकंदांची वेळ नोंदवत पाचवे स्थान मिळवले. तिच्यासाठीही ही कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली.
पदक जिंकल्यानंतर विथ्याने हे यश आपल्या जुळ्या बहिणीला समर्पित केले. तिच्या कुटुंबाने केलेल्या संघर्षाची आठवणही तिने यावेळी सांगितली. विथ्याचे वडील ट्रक चालक होते आणि त्यांचे मासिक उत्पन्न सुमारे 15,000 रुपये होते. आर्थिक अडचणी असतानाही त्यांनी मुलींच्या खेळासाठी आवश्यक बूट, कपडे आणि इतर साहित्य मिळवून दिले.
🥉 BRONZE FOR VITHYA RAMRAJ! 🇮🇳🔥
Vithya Ramraj powers over 10 hurdles to win bronze in the Women's 400m Hurdles at #AsianGames2026 🚧
⏱️ 54.75, a massive PERSONAL BEST 💥
🚨 NEW NATIONAL RECORD
She has broken the 55.42 mark that has stood since P.T. Usha in 1984, and that she…
— Athletics Federation of India (@afiindia) September 28, 2026
विथ्याने आपल्या प्रशिक्षकाचेही आभार मानले. 55 सेकंदांचा टप्पा पार करण्याची क्षमता तिच्यात आहे, असा विश्वास प्रशिक्षकांना होता. त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण सातत्याने मेहनत करत राहिल्याचे तिने सांगितले.
या कांस्यपदकामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील विथ्याच्या पदकांची संख्या आणखी वाढली आहे. हांगझू येथे तिने 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्य, तसेच 4x400 मीटर रिले आणि मिश्र रिले प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. नागोया येथील ही कामगिरी तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. ( Indian Athletics)