पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद रिझवान पुरता हैराण झाला आहे. इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर पीसीबीने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. इतकंच काय तर तपासाच्या नावावर मोहम्मद रिझवानचा फोनही जप्त केला. हा फोन त्याच्याकडून घेताना तीन तासात देऊ, असा शब्दही दिला होता. मात्र एक महिना उलटून गेल्यानंतरही त्याला काही फोन दिलेला नाही. यामुळे मोहम्मद रिझवानने पाकिस्तानच्या सायबर गुन्हे अन्वेषण संस्थेला पत्र लिहून फोन परत करण्याची विनवणी केली आहे. या प्रकरणी त्याने लाहोर उच्च न्यायालयातही याचिका केली होती. याचिकेच्या सुनावणी दरम्यान रिझवानने युक्तिवादात सांगितलं की, क्रिकेटमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा अधिकार फक्त आयसीसीच्या अँटी-करप्शन युनिटला आहे, सायबर एजन्सीला नाही. असं असलं तरी न्यायालयाने रिझवानला तपासात सहकार्य करण्यास सांगितलं आहे. तसेच सायबर गुन्हे अन्वेषण संस्थेला स्पष्ट शब्दात सूचना दिल्या की, रिझवानला विनाकारण त्रास देऊ नका. रिझवानला मोबाईल परत करण्याचे आदेशही दिले आहेत. पण सायबर गुन्हे अन्वेषण संस्थेने अजूनही मोबाईल परत केलेला नाही.
रिझवानला काहीच कळवलं नाही!
मोहम्मद रिझवानने सायबर गुन्हे अन्वेषण संस्थेला पत्र लिहून सांगितलं की, एजन्सीने अद्याप त्याच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही. इतकंच काय तर चौकशीसाठी कधी हजर व्हायचं आहे, याबाबतही सांगितलेलं नाही. खरं तर त्याने असं वागण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. पण तीन तासांच्या आत फोन परत मिळेल, हे आश्वासन दिल्याने त्याना ब्रिटनमध्ये आपल्या फोनचा एक्सेस दिला होता. पण आता पीसीबी आणि सायबर गुन्हे अन्वेषण संस्था या प्रकरणात रिझवानला कोणतंही सहकार्य करत नाही.
एशियन गेम्समध्ये दहाव्या दिवशी भारताचा गोल्डन धमाका; गुलवीर सिंहची मेडल हॅटट्रिक, रिले-हाय जम्पमध्ये कांस्य
जापानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स 2026 स्पर्धेचा दहावा दिवस भारतासाठी खास ठरला. भारताच्या ॲथलीट्सनी एकामागून एक दमदार कामगिरी करत देशाच्या झोळीत ...
मोहम्मद रिझवानवर ऑनलाइन सट्टेबाजी आणि जुगाराच्या प्रकरणांमध्ये थेट सहभाग असल्याचा आणि ड्रेसिंग रूममधील गोपनीय रणनीती सट्टेबाजांना लीक केल्याचा संशय आहे. पाकिस्तानची केंद्रीय सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. अद्याप या तपासाचा अंतिम अहवाल आलेला नाही आणि रिझवानवरील आरोप पूर्णपणे सिद्ध झालेले नाहीत. मात्र, या गंभीर चौकशीमुळे त्याला पाकिस्तान संघातून आणि देशांतर्गत क्रिकेटमधूनही सध्यातरी बाहेर ठेवण्यात आले आहे.