पाकिस्तानी खेळाडूंचं काय आहे कारण?
अफगाणिस्तान प्रीमियर लीग स्पर्धेला 27 डिसेंबर 2026 पासून सुरूवात होणार आहे. अफगाण क्रिकेट बोर्ड दुसऱ्यांदा ही स्पर्धा भरवण्याचा प्रयत्न करत आहे. 2018 नंतर थेट आता ही स्पर्धा होणार आहे. पण लीग स्पर्धेत पाकिस्तानचे खेळाडू खेळणार नाहीत. पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, पीसीबीने आपल्या खेळाडूंना ही लीग स्पर्धा खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यास मनाई केली आहे. या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंनी भाग घेऊ नये, अशीच इच्छा पीसीबीची आहे. मात्र या निर्णयामागे नेमकं काय कारण आहे अद्याप अस्पष्ट आहे. पण राजकीय वादाचं कारण सांगितलं जात आहे. कारण काही महिन्यांपासून या दोन्ही देशात कमालीचा वाद आहे. पण हेच कारण आहे का? याबाबत अस्पष्टता आहे.
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघाची बांधणी केली जात आहे. त्याचीच चाचपणी म्हणून आता प्रत्येक वनडे मालिका महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने ...
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मागच्या दोन तीन वर्षात टी20 लीगबाबत एक पॉलिसी तयार केली आहे. यात पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या सेंट्रल काँट्रॅक्टमधील खेळाडूंना एका वर्षात फक्त दोनहून अधिक विदेशी टी20 लीग स्पर्धेत खेळण्याची परवानगी नाही. पण करारबद्ध नसलेल्या खेळाडूंवर तसं काही बंधन नाही. असं असतानाही जर टी20 स्पेशालिस्ट आणि करारबद्ध नसलेल्या खेळाडूंवर बंधनं घातली गेली, तर नक्कीच राजकीय कारण असू शकते. कारण, पाकिस्तानी सैन्यदलाने अफगाणिस्तानच्या काही भागांवर हवाई हल्ले केले होते. दोन्ही देशात मार्च 2026 मध्ये तीन चार वेळा गोळीबारही झाला होता.